agrowon news in marathi, Joint Agresco in Dapoli from tomorrow, Maharashtra | Agrowon

दापोलीत उद्यापासून जॉइंट ॲग्रेस्को
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

पुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक (जाॅईंट ॲग्रेस्को) उद्यापासून (ता. २४) सुरू होत आहे. ही बैठक २६ मेपर्यंत दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे होणार आहे. यामध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये होत असलेल्या २०७ संशोधनाच्या शिफारशींना मान्यता प्रदान करण्यासाठी सादर करण्यात येणार आहे. 

पुणे ः यंदा ४६ वी संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक (जाॅईंट ॲग्रेस्को) उद्यापासून (ता. २४) सुरू होत आहे. ही बैठक २६ मेपर्यंत दापोली येथील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे होणार आहे. यामध्ये राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये होत असलेल्या २०७ संशोधनाच्या शिफारशींना मान्यता प्रदान करण्यासाठी सादर करण्यात येणार आहे. 

राज्यात १९७३ पासून आजतागायत एकूण पाच हजार ४४३ शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये परभणी कृषी विद्यापीठाच्या ९९४, दापोली कृषी विद्यापीठाच्या ११९६, राहुरी कृषी विद्यापीठाच्या १७१६ आणि अकोला कृषी विद्यापीठाच्या १५३७ शिफारशींचा समावेश आहे. चारही कृषी विद्यापीठात एकूण ७९ संशोधन केंद्रापैकी कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत २७, अकोला १९, परभणी १७ आणि दापोली १६ संशोधन केंद्रे कार्यरत आहेत.

या संशोधन केंद्रामार्फत ६५२ नवीन वाण, १२२ कृषी अवजारे, यंत्र प्रसारित केले आहेत. तसेच सुधारित तंत्रज्ञानाच्या विविध पीकनिहाय चार हजार ६५३ शिफारशी देण्यात आलेल्या आहेत. यंदा दापाली कृषी विद्यापीठातील बैठकीमध्ये एकूण २०७ शिफारशी सादर केल्या जाणार आहेत. त्यात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ६४, अकोल्यातील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ४२, परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या ४१ आणि दापोलीतील डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ६० शिफारशींचा समावेश आहे.

तसेच चारही कृषी विद्यापीठातून एकूण सतरा नवीन वाण शिफारशीसाठी आणि दोन पिकांचे वाण पूर्वपरवानगीसाठी सादर होणार असून नवीन तेरा कृषी अवजारांना, यंत्रांना मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रात विविध पिकांच्या संदर्भात सुधारित तंत्रज्ञानाच्या बाबतीत १८४ शिफारशींचे सादरीकरण होणार आहे. 

यंदाच्या बैठकीमध्ये विद्यापीठनिहाय प्रस्तावित शिफारशी 

विद्यापीठ  प्रसारित 
वाण
पूर्वप्रसारित वाण तंत्रज्ञान शिफारशी कृषी यंत्रे, अवजारे एकूण 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी  ०      ६५        १   ६४
डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, दापोली   ४  २  ३१   ५    ४२ 
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी  ३ ०   ३२ ६    ४१ 
डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली    ३     ०    ५६     १   ६०

                
         
             
 
 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...