agrowon news in marathi, Kharip season sowing on 93 lakh heaters, Maharashtra | Agrowon

खरिपाची पेरणी ९३ लाख हेक्टरवर
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

नवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल झाल्यानंतर पेरण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत खरिपाच्या ९३ लाख हेक्टवर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच काळात ९४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा एक लाख हेक्टरने पेरा माघाराला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे.

नवी दिल्ली ः देशात यंदा वेळेवर मॉन्सून दाखल झाल्यानंतर पेरण्यांनी वेग घेतला आहे. आतापर्यंत खरिपाच्या ९३ लाख हेक्टवर पेरण्या झाल्या आहेत. मागील वर्षी याच काळात ९४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा एक लाख हेक्टरने पेरा माघाराला आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे.

देशात मॉन्सून यंदा वेळेच्या आधीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्याला प्राधान्य दिले. मात्र, अनेक भागांत रब्बीची पिके शेतात उभी असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ही पिके काढण्यास उशीर झाला. त्यामुळे खरीप परेणीला उशीर होत आहे. देशात खरीप हंगामात आतापर्यंत साधारणतः ९१ लाख हेक्टरवर पेरा होत असतो. यापेक्षा सध्या थोडा जास्त पेरा झाला आहे. खरिपातील महत्त्वाचे पीक म्हणजेच भाताची यंदा पेरणी वाढली असून, सध्या ६ लाख ९३ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. मागील वर्षी ६ लाख ८७ हजार हेक्टरवर लागवड झाला होता.     

देशात कडधान्य पेरणी कमी झाली. हुलगा पिकाची पेरणी मागील वर्षीपेक्षा कमी झाली आहे, तर उडीद, मूग आणि इतर कडधान्यांची पेरणी घटली आहे. खरिपातील आणखी एक महत्त्वाचे पीक मक्याची पेरणी २३ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षी मक्याला कमी दर मिळाल्याने यंदाच्या हंगामात मका पेरणी घटली आहे. यंदा शेतकरी मोठ्या प्रमाणात भात लागवडीकडे वळाले आहेत. मक्याची ४ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. 

कडधान्याचा पेरा घटला
मागील हंगामात देशात कडधान्याचे विक्रमी उत्पादन झाले होते. त्यामुळे बाजारात आवक वाढताच त्याचा परिणाम दरावर होऊन दर हमीभावाच्या खुपच खाली गेले होते. तसेच शासकीय खरेदीसाठी देशभरात शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे २०१८-१९ च्या हंगामात शेतकरी कडधान्याचा पेरा कमी करतील, अशी शक्यता आधीच वर्तविण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे आतापर्यंत झालेल्या खरिपाच्या पेरणीमध्ये कडधान्याचा पेरा घटला आहे. कडधान्याकडून शेतकरी यंदा इतर पिकांकडे वळाले आहेत. आतापर्यंत खरिपात २ लाख ५२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. मागील वर्षी आतापर्यंत २ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.

पीकनिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)
 

पीक    २०१७-१८    २०१८-१९
भात    ६.८७ लाख  ६.९३ लाख
तूर    ४६,०००   ५२,०००
उडिद   ६७,०००   ४८,०००
मूग    ७५,०००    ६९,०००
हुलगा  ८,०००     १६,०००
इतर कडधान्ये  ८४,०००  ६८,०००
ज्वारी     १.०९ लाख     १.१७ लाख
बाजरी   ५६,०००     ३३,०००
रागी     ९५,०००  ८९,०००
लहान भरडधान्य   ७५,०००   ७७,०००
मका ६.३४ लाख   ४.९१ लाख
भुईमूग  ९१,०००    ६१,०००
सोयाबीन  ३२,०००   ५०,०००
सूर्यफूल १३,०००     ११,०००
तीळ    ३६,०००  ४०,०००
ऊस    ४९.४८ लाख     ५०.०१ लाख
ताग     ६.८९ लाख     ६.९० लाख
कापूस    १६.६७ लाख  १६.९१ लाख

      
   
     
  
    
    
   

   

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...