agrowon news in marathi, kharip sowing on 116 heacter, Maharashtra | Agrowon

खरिपाचा पेरा ११६ लाख हेक्टरवर
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नवी दिल्ली ः देशात आतापर्यंत खरिपाची पेरणी ११६ लाख हेक्टवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात झालेल्या पेरणीच्या तुलनेत यंदा कमी पेरा झाला आहे. मागील वर्षी १२८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे. 

नवी दिल्ली ः देशात आतापर्यंत खरिपाची पेरणी ११६ लाख हेक्टवर झाली आहे. मागील वर्षी याच काळात झालेल्या पेरणीच्या तुलनेत यंदा कमी पेरा झाला आहे. मागील वर्षी १२८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे. 

देशातील अनेक भागात सध्या मॉन्सूनचा जोर कमी झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. सुरवातील जोरदार पावसाने हजरी लावल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने ठिक ठिकाणी हजेरी लावली; परंतु त्यामुळे पेरणी वाढण्यास मदत झाली नाही. देशात खरिपाचा पेरा आतापर्यंत ११६ लाख हेक्टरवर झाला आहे. मागील वर्षी याच काळात १२८ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. मागील पाच वर्षांतील याच काळातील सरासरी पेरणी ही १२५ लाख हेक्टरवर होती. यंदा या सरासरीपेक्षाही कमी पेरणी झाली आहे.

खरिपातील महत्त्वाचे पीक भाताची पेरणी ११ लाख हेक्टरवर झाली आहे. मागील वर्षीही या काळात एवढीच पेरणी झाली होती. देशात मॉन्सून दाखल होताच पेरण्यांनी वेग घेतला; परंतु पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी थांबविल्या. उघडिपीच्या काळात दुबार पेरणीचे संकट येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी न करण्यास प्राधान्य दिले.

सध्या झालेल्या पेरणीत कडध्यान्याची पेरणी कमी झाली आहे. मागील हंगामात कडधान्यांना हमीभावापेक्षीही कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकांना प्राधान्य दिले आहे. आतापर्यंत देशात ५ लाख ९१ हजार हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली. मागील वर्षी याच काळात ७ लाख ८२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.

कडधान्यामध्ये तूर आणि कुल्थीचे क्षेत्र मागील वर्षीपेक्षा वाढले आहे. तर उडीद, मूग आणि इतर कडधान्यांचा पेरा घटला आहे. 
आता मॉन्सून अनेक भागात पुन्हा सक्रिय होत असून अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकरी पेरणीला प्रारंभ करतील आणि खरिपाचा पेरा वाढेल, अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...