agrowon news in marathi, kharip sowing on 65 lac hector in country, Maharashtra | Agrowon

देशात ६५ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

नवी दिल्ली ः भारतामध्ये खरीप हंगामातील पेरणीला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत ६५.५ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. लागवड क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घट झाली आहे. मागील वर्षी सद्यस्थितीत ६९.८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.
मागील रब्बी हंगामामध्ये देशाच्या उत्तर आणि पूर्वेच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने मळणीसाठी उशीर झाला होता. त्यामुळे यंदाच्या खरीप पेरणीत घट झाली अाहे.

नवी दिल्ली ः भारतामध्ये खरीप हंगामातील पेरणीला प्रारंभ झाला असून, आतापर्यंत ६५.५ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. लागवड क्षेत्रात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा घट झाली आहे. मागील वर्षी सद्यस्थितीत ६९.८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.
मागील रब्बी हंगामामध्ये देशाच्या उत्तर आणि पूर्वेच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाल्याने मळणीसाठी उशीर झाला होता. त्यामुळे यंदाच्या खरीप पेरणीत घट झाली अाहे.

अन्नधान्य लागवडीत भात हे मुख्य पीक असून यंदा १ लाख ५२ हजारहून अधिक हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड झाली अाहे. मात्र, मागील वर्षी २ लाख १७ हजार हेक्टर लागवड क्षेत्रावर त्याची लागवड होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डाळींच्या लागवडीत मोठी घट झाली अाहे. १ लाख १५ हजार हेक्टर क्षेत्रावरून ६१ हजार हेक्टर क्षेत्र एवढ्या कमी क्षेत्रावर डाळींची लागवड झाली अाहे. 

तेलबियांची एकूण लागवड ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली असून मागील वर्षी सद्यस्थितीत झालेल्या ४१ हजार हेक्टर क्षेत्रावरून ही घसरण झाली आहे. मका हे पीक ही खरिपात प्रामुख्याने घेतले जाते. मका लागवड २० हजार हेक्टर क्षेत्रावर झाले असून मागील वर्षी या काळात २५ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर लागवड झाली होती. असे लागवडीखालील क्षेत्र असून सामान्य मॉन्सूनच्या अंदाजानुसार यंदा लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होणार असल्याचे हवामान शास्त्र विभागाकडून सांगितले. 

 बहुतांश खरीप पिके मॉन्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. नैऋत्य मॉन्सून भारताच्या समुद्रकाठावर सुमारे २९ मे रोजी धडकणार आहे. तर सामान्यपणे दोन दिवस उशीर होऊ शकतो, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले.

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली लागवड (हेक्टरमध्ये)
 

पीक  २०१८-१९ २०१७-१८
भात १,५२,००० २,१७,०००
तूर  ५,००० ७००० 
उडीद   १४,००० ३३,०००
कडध्यान्य २६,०००  ४८,०००
ज्वारी १५,००० २५,०००
बाजरी   १,००० १,०००
मका    २०,०००  २५,०००
भुईमूग १०,००० १०,०००
सूर्यफूल  ९,००० ९,०००
तीळ  १७,००० २२,०००
ऊस    ४८,६७,०००  ४७,८८,०००
कापूस   ७,८२,००० ११,२४,०००

 
     
      
        
      
   
        
    
       
  
      

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...