नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
ताज्या घडामोडी
कोल्हापूर : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे मंगळवारी (ता. ७) कृषी विभागासह जिल्हा परिषदेचे काम ठप्प झाले. कृषी विभागाच्या विविध कार्यालयांत अधिकारी उपस्थित होते. पण कर्मचारी अनुपस्थित असल्याने कृषी विभागाचे कामकाज ठप्प झाले.
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत कडकडीत बंद करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारावर जमत कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. कर्मचारी, वाहनचालक रजेवर असल्याने खातेप्रमुखांना स्वतःचे वाहन घेऊन कार्यालयात यावे लागले.

जिल्हा परिषदेच्या ५३ संघटना आणि १५ हजार कर्मचारी संपावर गेल्याने मिनी मंत्रालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधींनी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कोणी कर्मचारी काम करत नसल्याची खात्री केली. मात्र, एकही कर्मचारी कामावर असल्याचे दिसून आले नाही.
अकरा वाजण्याच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वारावर सर्व कर्मचारी व संघटना प्रतिनिधींनी सभा घेऊन सरकारच्या विरोधात निदर्शने केली. कृषी विभागात संपाच्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू होत्या.
- 1 of 348
- ››