agrowon news in marathi, list of loan waivers pest in outside of banks, Maharashtra | Agrowon

कर्जमाफीच्या याद्या बॅंकेबाहेर लावा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 जून 2018

परभणी  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बॅंकांच्या शाखेबाहेर लावाव्यात. शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जवाटप करण्यात यावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा अग्रणी बॅंकेच्या कार्यालयामध्ये मंगळवारी (ता.१९) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

परभणी  : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बॅंकांच्या शाखेबाहेर लावाव्यात. शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जवाटप करण्यात यावे, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा अग्रणी बॅंकेच्या कार्यालयामध्ये मंगळवारी (ता.१९) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या वेळी कार्यकर्त्यांनी दुपारचे जेवण बॅंकेतच केले. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या जिल्ह्यातील बॅंकांमध्ये लावण्यात आल्या नाहीत. बॅंकांच्या शाखांमध्ये जाऊन कर्जमाफी बाबत विचारणा केली असता लाभार्थी शेतकऱ्यांना बॅंक कर्मचाऱ्यांकडून माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. खरिपाच्या पेरणीसाठी बि, बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.

बॅंकेकडून पीक कर्ज घ्यावे की सावकारांकडून कर्ज घ्यावे अशा संमभ्रमावस्थेत शेतकरी आहेत. त्यामुळे कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या याद्या बॅंकेबाहेर लावाव्यात. पात्र शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जवाटप करावे, अशी मागणी सातत्याने करूनही त्याकडे संबंधीत यंत्रणांनी दुर्लक्ष केले.

त्यामुळे मंगळवारी (ता.१९) स्वाभिमानी शेतकरी संघटनचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामभाऊ आवरगंड, केशव आरमळ, भगवान शिंदे, डिगंबर पवार, शिवाजी ढगे, बालाजी मोहिते, राहुल मस्के, रामकिशन गरुड, गजानन गरुड, राजू शिंदे, अजित पवार, भास्कर खटिंग, पांडुरंग आवचार आदींनी जिल्हा अग्रणी बॅंकेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यका मार्फत गावांमध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे लेखी आश्वासन अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक तुकाराम खिल्लारे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...