agrowon news in marathi, loss due pre-monsoon rain, Maharashtra | Agrowon

माॅन्सूनपूर्व पावसाने दाणादाण
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे : राज्यात मेघगर्जना, विजा, वादळी वाऱ्यासह माॅन्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला अाहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे : राज्यात मेघगर्जना, विजा, वादळी वाऱ्यासह माॅन्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला अाहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.

पहिल्याच पावसाने अनेक ठिकाणी बंधारे भरून, ओढे-नाल्यांना पाणी आले. या पावसामुळे खरिपाच्या पेरण्यांनाही वेग येणार आहे. यवतमाळ तालुक्यातील ब्रह्मी येथील शिवारात झाडाखाली बसलेल्या मेंढपाळांवर वीज कोसळून तिघे गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाने शेतजमिनींची माती वाहून गेली. हिमायनगर येथे ३७ मेंढ्या दगावल्या. गुरुवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबईसह कोकणात दमदार पाऊस सुरू आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रात्नागिरी, रायगड जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने पाऊस पडत असून, गुरुवारी पहाटेपासून मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी भागात मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पेरणीपूर्व तयारीला वेग येणार असून, जिल्ह्यात धुळवाफेवर भात, उडीद, सोयाबीन, भुईमुगाची पेरणी झाली आहे. सांगली जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. द्राक्ष बाग आणि हळद लागवडीला हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, इंदापूर, दौंड, बारामती, मुळशी तालुक्यांमध्ये वादळी वारे, जोरदार पावसाने चारापिके, भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. ओढे-नाल्यांना पूर अाल्याने बंधारे भरले आहेत. पावसामुळे पाण्याअभावी जळून चाललेल्या पिकांना जीवदान मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात झालेल्या पावसाने पुसेगाव येथील येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली. विसापूरमधील ओढ्याला पूर आल्याने सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पोषक वातावरणामुळे काही ठिकाणी खरिपाच्या पेरणीस प्रारंभ झाला आहे. 

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, नांदेडमध्ये जोरदार पावसाने जमिनीची माती वाहून गेली आहे. यात लागवड केलेले हळद बेणे, सोयाबीन बियाणे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हिमायतनगर येथे ३७ मेंढ्या दगावल्या. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने शेती व नाल्यांमधून पाणी वाहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बहुतांश भागांत दमदार ते जोरदार बरसलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाच जोर आला असून, काही भागांत कपाशीची लागवड करण्यालाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी वादळी पाऊस पडला.

पावसाचा फटका

  •      कोकणात पावसाने जोर धरला
  •      राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस
  •      यवतमाळमध्ये वीज पडून मेंढपाळ जखमी
  •      नांदेड जिल्ह्यात शेतातील माती वाहून गेली
  •      ओढे-नाले वाहू लागले, बंधारे भरले 
  •      भाजीपाला, फळे, चारापिकांचे नुकसान

इतर अॅग्रो विशेष
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...
मराठा आरक्षणासाठी आता लढा नाही, जल्लोष...नगर : मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून...
कापूसटंचाईने कारखानदारांसमोर अडचणी जळगाव ः तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी...
उत्पादन, थेट विक्री, पूरक व्यवसायांतून...कृषी विद्यापीठ, तज्ज्ञ, वाचन, ज्ञान, विविध प्रयोग...
स्वयंपूर्ण, कमी खर्चिक दर्जेदार...पुणे जिल्ह्यातील वेळू येथील गुलाब घुले यांनी आपली...
उगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...
...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...
बुलडाण्यात ३३ टन रेशीम कोष उत्पादनबुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक...
भारतीय दूध सुरक्षितनवी दिल्ली ः भारतातील दुधाच्या दर्जाबाबात सतत...
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...