लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडत

मला दोन गायींची सोडत लागली आहे. असे पहिल्यांदाच झाले आहे. या पद्धतीत सारे गाव खूष आहे. नेहमीसाठी ही पद्धत खूपच चांगली आहे. - राजू साळवे, लाभार्थी, चिंचविहिरे
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडत
लाभार्थी निवडीसाठी ग्रामसभेत सोडत

राहुरी, जि. नगर : चिंचविहिरे येथे कृषी विभागाच्या कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ग्रामसभेत सोडत पद्धतीने पारदर्शीपणे झाली. गावपातळीवर लाभार्थी निवडीसाठी ही पद्धत राबविणारे चिंचविहिरे  पहिले गाव ठरले आहे. लाभार्थी निवडीसाठीतील अनियमितता टाळण्यासाठी ही पद्धती सर्वत्र वापरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ग्रामसभेत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत पाच योजनांसाठी लाभार्थी निवड झाली. अनेकदा राजकीय दडपण, भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांची मनमानी अशा अनेक त्रुटींचा प्रभाव लाभार्थी निवड पद्धतीत आढळतो. खरे गरजू लाभार्थी वंचित राहतात; तर अनेकदा ठराविक तेच तेच लाभार्थी असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यातील अनेक त्रुटींवर रामबाण उपाय म्हणून ग्रामसभेत सोडत पद्धतीने लाभार्थी निवड करण्याचा पर्याय कृषी सहायक रायभान गायकवाड यांनी मांडला. सोडत पद्धतीच्या पूर्वतयारीसाठी विशेष ग्रामसभा झाली. त्यात त्यांनी ही सर्व योजना, निकष सांगितले. सर्वांना ही पद्धत पसंत पडली. सरपंच वृषाली पानसंबळ अध्यक्षस्थानी होत्या. संकरित गाय वाटपसाठी ८० चिठ्ठ्यांतून पहिले २५ लाभार्थी व नंतरच्या लाभार्थीचा क्रम निश्चिती झाली. त्यांना प्रत्येकी ४० हजार अनुदान मिळेल. शेळी व कुक्कुटपालनाचे ५० चिठ्ठ्यांतून पहिले चाळीस लाभार्थी व नंतर पुढील क्रमनिश्चिती झाली. एकूण दहा लाख अनुदान मिळेल. मत्स्यशेतीचे १५ पैकी दहा लाभार्थी व पुढील क्रम निश्चिती झाली. प्रत्येकी एक लाखप्रमाणे दहा लाख अनुदान मिळेल. मूरघासाच्या प्रकल्पास प्रत्येकी सव्वा लाख अनुदान मिळेल. दहा चिठ्ठ्यातून पाच लाभार्थी निवड झाली. पॅक हाऊसच्या दोन लाख अनुदानासाठी तीन अर्जाच्या चिठ्ठीतून एकाची निवड झाली. एकूण १५८ चिठ्ठीतून ५४ लाभार्थी निवड झाली. त्यांना एकूण २९ लाख अनुदान मिळेल. मंडळ कृषी अधिकारी विक्रम वाघमोडे, शांताबाई गिते, दगडू गिते, ग्रामपंचायत सदस्य राजू नालकर, उपसरपंच संतोष पवार, तलाठी वाय. डी. शेख, पर्यवेक्षक बी. एल. ढगे, पोलिस पाटील हिराबाई नरवडे, सुधीर झांबरे आदी या वेळी हजर होते. मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com