agrowon news in marathi,, Maharashtra | Agrowon

ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता ओढा
राजकुमार चौगुले
मंगळवार, 22 मे 2018

आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर सातत्याने घसरत आहेत.  ही बाब साखर उद्योगाला संकटात आणणारी ठरत आहे. त्यामुळे  दराअभावी यंदाच्या हंगामात अनेक देशांनी पक्की साखर तयार करण्यापेक्षा इंधन निर्मितीकडे ओढा सुरू ठेवला आहे. 
- मानसिंग खोराटे, साखर निर्यातदार

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच साखरेला मागणी नसल्याने आता साखर उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर असणाऱ्या ब्राझील, थायलंड आदी देशांनी यंदाच्या हंगामात लवचिकपणे धोरणात बदल केला आहे. साखरेचे उत्पादन कमी करून कच्ची साखर व इथेनॉलच्या निर्मितीकडे कल वाढविला आहे. सध्या ब्राझीलमध्ये उस हंगाम सुरू असून, या देशाने इथेनॉलच्या निर्मितीलाच प्राधान्य दिले आहे. 

सध्या ब्राझील मध्ये ऊस हंगाम सुरू आहे. मार्च ते डिसेंबर या कालावधीत बॉझीलचा हंगाम सुरू असतो. गेल्या दोन तीन महिन्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर नीचांकी पातळीवर गेले आहेत. जगभरातच साखरेचे उत्पादन वाढल्याने कोणत्याच भागातून साखरेला मागणी नसल्याचे चित्र दिसतात. ब्राझीलने यंदा इथेनॉलकडे ओढा वाढविला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर २००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या दरात साखर विकणे कोणालाच शक्‍य नसल्याने ब्राझीलने यंदाही जादा प्रमाणात इथेनॉल तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. 

थायलंड करणार जादा इथेनॉलनिर्मिती 
ब्राझीलनंतर साखर निर्यातीत अग्रेसर असणाऱ्या थायलंडनेही ३ लाख मेट्रीक टन कच्चया साखरेची निर्मिती करण्याचे ठरविले आहे. या साखरेपासून इथेनॉल बनविण्यासाठी या देशाने आपली धोरणे बदलली आहेत. वातावरण चांगला असल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ होत आहे. प्रत्येक वर्षी दोन लाख टन कच्चा साखर इंधन तयार करण्यासाठी वापरली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात पक्क्‍या साखरेची केविलवाणी अवस्था झाल्याने या देशाने तातडीने धोरणात बदल करत इंधन तयार करण्यासाठी पुन्हा ३ लाख टन कच्ची साखर वापरण्याचे निश्‍चित केले आहे. कच्या साखरेचे दरही खाली आले आहेत. पण इंधनाचे दर चांगले असल्याने कच्च्या साखरेपासून इथेनॉल तयार करण्यासाठी थायलंडने पावले उचलली आहेत. 

पुढचा हंगाम न घेण्याचा उत्तर प्रदेशातील कारखान्यांचा इशारा
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची अवस्था बिकट झाल्याने देशातील साखर कारखानदारही हबकले आहेत. उत्तर प्रदेश शुगल मिल असोसिएशनचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना पत्र लिहून पुढील वर्षीचा हंगाम घेत नसल्याचे कळविले आहे. उत्तर प्रदेशात ९४ खासगी कारखान्यांनी सध्याच्या स्थितीबाबत हतबलता व्यक्त केली आहे. सध्या उत्पादकांच्या देणी देण्याचा असणारा दबाव कारखाने झेलू शकत नाहीत. यामुळे या ओझ्याच्या सावटाखाली पुढील हंगाम सुरू करणे अशक्‍य असल्यांचे उत्तर प्रदेशातील कारखान्यांनी पत्रात म्हटले आहे. कोणत्याही परिस्थितीत शासनाकडून पुरेसे अनुदान मिळाल्याशिवाय राज्यातील पुढील हंगाम सुरू होणे अगदीच अशक्‍य असल्याचे कारखान्याच्या प्रतिनिधींनी पत्रात म्हटले आहे. 

 

इतर अॅग्रो विशेष
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
मध्यस्थविरहीत विक्री व्यवस्था उभी...अकोला येथे कार्यरत असलेल्या स्नातकोत्तर पशुवैद्यक...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कालवशनवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनकनवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स...
देशाचा विकास वेगाने होतोय : राष्ट्रपतीनवी दिल्ली : ''देशातील परिस्थिती झपाट्याने...
स्वातंत्र्य संग्रामातील ग्रामीण सहभागब्रिटिश सत्तेविरोधी स्वातंत्र्य चळवळीत केवळ शहरी...
सापळ्यात अडकलाय शेतकरीयावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बीटी कापसावर एक...
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...