agrowon news in marathi, marketing federation director on long leave due to over work charge, Maharashtra | Agrowon

कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक दीर्घ रजेवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक पदाच्या अतिरिक्त पदभारामुळे कामाच्या तणावात असलेले पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड दीर्घ रजेवर गेले आहेत. पणन संचालकपदाचा कार्यभार सहकार आयुक्तालयातील तपासणी व निवडणूक विभागाचे अपर निंबधक नवनाथ यगलेवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. 

पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक पदाच्या अतिरिक्त पदभारामुळे कामाच्या तणावात असलेले पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड दीर्घ रजेवर गेले आहेत. पणन संचालकपदाचा कार्यभार सहकार आयुक्तालयातील तपासणी व निवडणूक विभागाचे अपर निंबधक नवनाथ यगलेवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. 

डॉ. जाेगदंड यांची गेल्या वर्षी पूर्णवेळ पणन संचालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती करत असताना त्यांच्याकडे सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक पदाचा कार्यभार कायम ठेवण्यात आला हाेता. सहकार विभागीत हुशार अधिकारी म्हणून त्यांच्याकडे शेतकरी कर्जमाफी याेजनेची जबाबदारीदेखील साेपविण्यात आली हाेती. पणन संचालक आणि कर्जमाफी याेजनेच्या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे डॉ. जाेगदंड गेली अनेक दिवसांपासून तणावाखाली हाेते. त्यातच पणन संचालनालयातील सुनावण्यांचे कामदेखील त्यांना पाहावे लागत हाेते. तसेच राज्यातील विविध बाजार समित्यांच्या विकासकामांच्या (१२-१) च्या परवानग्यांची प्रकरणेदेखील प्रलंबित आहेत.

या दाेन्ही पदभारामुळे काेणत्याही एका विभागाला न्याय देऊ शकत नसल्याची डॉ. जाेदगंड यांची भावना झाली हाेती. त्यातच अनेक प्रकरणे प्रलंबित राहत असल्याचादेखील तणाव हाेता. तर बाजार समित्यांकडूनदेखील १२-१ च्या परवानग्या मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त हाेत हाेती. यामुळे सहकार विभागातील अपर निबंधक पदाचा कार्यभार काढून घ्यावा, अशी मागणी डॉ. जाेगदंड यांनी सहकारमंत्र्यांकडे केली हाेती. मात्र ही मागणी अद्याप पूर्ण न झाल्याने कामाच्या अतिरिक्त ताणामुळे डॉ. जाेगदंड यांनी दीर्घ रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...