agrowon news in marathi, MATT gave abeyance for demossion of krushi sahayak, Maharashtra | Agrowon

‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांच्या ‘डिमोशन’ला ‘मॅट’ची तूर्त स्थगिती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 23 मे 2018

अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नत केलेल्या कर्मचाऱ्यांना कृषी सहायक पदावर पदावनत (डिमोशन) करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २२) नियोजित असलेली प्रक्रिया तूर्त रद्द करण्यात आली अाहे. डिमोशन केल्या जाणाऱ्या पर्यवेक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा(मॅट)त धाव घेतल्याने ही स्थगिती देण्यात अाली. सोमवारी (ता. २१) सायंकाळी याबाबतचे तातडीचे अादेश विभागातील कृषी अधिकाऱ्यांना पाठवण्यात अाले.   

अकोला ः सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नत केलेल्या कर्मचाऱ्यांना कृषी सहायक पदावर पदावनत (डिमोशन) करण्याच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २२) नियोजित असलेली प्रक्रिया तूर्त रद्द करण्यात आली अाहे. डिमोशन केल्या जाणाऱ्या पर्यवेक्षकांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणा(मॅट)त धाव घेतल्याने ही स्थगिती देण्यात अाली. सोमवारी (ता. २१) सायंकाळी याबाबतचे तातडीचे अादेश विभागातील कृषी अधिकाऱ्यांना पाठवण्यात अाले.   

अमरावती विभागात सन २०११ मध्ये नियमित व तदर्थ पदोन्नती देताना कृषी सहायक संवर्गाच्या अंतरीम ज्येष्ठता सूचीनुसार देण्यात अाली होती. परंतु सन २०१५ मध्ये जेव्हा ही ज्येष्ठता सूची प्रसिद्ध झाली त्या वेळी अनेक उमेदरावांचे क्रम बदलेले अाढळले. अनेक अपात्र उमेदवारांना अंतरिम ज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणी नियमित पदोन्नती दिलेल्या उमेदवारांपैकी अंतिम ज्येष्ठता सूचीप्रमाणे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे डिमोशन केले जाणार होते.

तसेच त्यांच्याएेवजी पात्र होणाऱ्या ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार होती. तर तदर्थ पदोन्नती दिलेल्या उमेदवारांचे पदावनत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात अाली होती. यासाठी मंगळवारी समुपदेशन प्रक्रिया राबवून डिमोशन होत असलेल्यांना हवे ते ठिकाण दिले जाणार होते. 

राज्यात अमरावती विभागात एवढ्या मोठ्या संख्येने डिमोशन केले जाणार असल्याने कृषी खात्यात खळबळ उडाली होती. प्रशासनाकडून होत असलेल्या या प्रक्रियेला २०११ मध्ये प्रमोशन मिळालेल्यांचा अाक्षेप होता. त्यानुसार यातील काहींनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार उपरोक्त प्रक्रियेला तातडीने स्थगिती देण्यात अाली. ‘मॅट’च्या निर्णयामुळे या पर्यवेक्षकांना सध्या तरी दिलासा मिळाला अाहे. अाता या प्रकरणात अंतीम निर्णय काय येतो यावर पुढील प्रक्रिया अवलंबून अाहे.

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...