agrowon news in marathi, meeting of sukanu committee in Jalgaon, Maharashtra | Agrowon

सुकाणू समितीच्या कार्यकारिणीची जवळगाव येथे बैठक
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जून 2018

अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू समितीच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आणि सुकाणू समिती कार्यकर्ता शिबिर जवळगाव (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथे २५ व २६ जून रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष व राज्य सुकाणू समितीचे सदस्य कालिदास आपेट यांनी दिली.

अंबाजोगाई, जि. बीड : शेतकरी संघटना व सुकाणू समितीच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आणि सुकाणू समिती कार्यकर्ता शिबिर जवळगाव (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथे २५ व २६ जून रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष व राज्य सुकाणू समितीचे सदस्य कालिदास आपेट यांनी दिली.

शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. तसेच परदेशातील काळा पैसा आणुन प्रत्येकाला १५ लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले. परंतु नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने ६ फेब्रुवारी २०१५ रोजी सर्वोच्च न्यायालयात शेतकरी संघटनेच्या ३७६/२०११ याचिकेवर शेतीमालाला उत्पादन खर्च अधीक ५० टक्के नफा देणार नाही, असे शपथपत्र दाखल करून शेतकऱ्यांचा विश्‍वासघात केल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.

११ जून २०१७ रोजी देवेंद्र फडणवीस सरकारने रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील शेतकरी संघटनांची सुकाणू समितीसोबत चर्चा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती केली. यासाठी ३४ हजार कोटी रपुयांची तरतूद केली. आजतागायत छत्रपती शिवाजी महाराज कुर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी व सहकारी बॅंका नवीन शेती कर्जाचे वाटप करीत नाहीत. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ होत आहे. 

शेतकरी संघटना व सुकाणू समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला रघुनाथदादा पाटील, किशोर ढमाले, डॉ. बाबा आढाव, सुभाष वारे, विश्‍वास उटगी, सुशीलाताई मोराळे, गणेशकाका जगताप, प्रतिभा शिंदे, राजू देसले, सुभाष लोमटे, प्रशांत पवार, सुभाष काकुस्ते, करण गायकर, अमिताभ पावडे, देवानंद पवार, अभिजित फाळके, गणेश कदम, सचिन धांडे, विश्‍वनाथ पाटील, एस. बी. पाटील, एस. व्ही. जाधव, शिवाजीनाना नांदखिले, बाळासाहेब पठारे, विमलताई आकनगिरे, जे. डी. मामडगे, डॉ. डी. ए. चव्हाण, हनुमंत चाटे, रामेश्‍वर गाडे आदी सुकाणू समितीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...