agrowon news in marathi, milk producer in angry due to milk organisation policy, Maharashtra | Agrowon

दूध संघांच्या व्यावसायिक धोरणाने दुग्धोत्पादक संतप्त
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

गायीच्या दूध दरात कपात केली तर याचा परिणाम दुग्धोत्पाक गायींच्या किमतीवरही होणार आहे. जर दूध धंदा बंद करून गायी विकायच्या जरी ठरविल्या तरी गायींना कवडीमोल किंमत येणार आहे. यामुळे अशा निर्णयामुळे दुग्धोत्पादक चक्रव्यूहात अडकला आहे.
- संपतराव पवार-पाटील, माजी आमदार

कोल्हापूर : जिल्ह्यातील मातब्बर दूध संघांनी शेतकरी हित बाजूला ठेवत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून गायीच्या दुधास नापसंती दर्शविल्याने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

जिल्ह्यात पहिल्यांदा स्वाभिमानीने अतिरिक्त ठरणाऱ्या गायीच्या दुध दरात कपात करीत दूध संघाची भूमिका स्पष्ट केली. यानंतर जिल्ह्यात सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघानेही (गोकूळ) अतिरिक्त दुधाचे कारण देत कार्यक्षेत्राबाहेरील दुधाच्या खरेदीस एक रुपयांनी कपात केली. दूध जादा होत असले तरी या खेळात मात्र दूध उत्पादकाचा जीव जात असल्याचे चित्र आहे.

शासन दरबारी अपेक्षित निर्णय होत नसल्याने अनेक दूध संघ चालक वैतागले आहेत. पावडरीला उठाव नाही, म्हशीच्या तुलनेत गायीच्या दुधाची विक्री खूपच कमी प्रमाणात होते. दूध पावडर व तत्सम पदार्थांच्या किमती घसरल्याने उपपदार्थ तयार करणेही परवडत नाही. यामुळे केवळ गायीच्या दुधावर संघाचे अर्थकारण चालत नसल्याने गायीच्या दुधाला कमी भाव देणे अथवा जादाचे दूध न स्वीकारणे असे बदल आम्ही स्वीकारत असल्याचे दूध संघातून सांगण्यात आले. 

गेल्या एक दोन महिन्यात सहकारी दूध संघांना खासगी व्यापाऱ्यांकडून गायीच्या दुधाचा पुरवठा म्हशीच्या तुलनेत जास्त होत आहे. दोन्ही दुधाचा मेळ घालणे शक्‍य नसल्याने दूध संघ तोट्याच्या गर्तेत जात आहेत. यामुळे दर कमी केल्याशिवाय पर्याय नसल्याचे दूध संघांच्या प्रतिनिधींनी सांगितले. गोकूळने कार्यक्षेत्रातील गायीच्या दूध खरेदी दरात कपात केली नाही. यामुळे अद्याप तरी जिल्ह्यातील हजारो गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जादाचे नुकसान टाळता आले आहे.

येत्या काही दिवसात अन्य काही दूध संघही गायीच्या जादा येणाऱ्या दुधाला कमी दर देण्याच्या विचारात आहेत.  शासन व दूध संघांच्या खेळात उत्पादक भरडून जात आहेत. संघांनी दूध दर नाकारले तर करायचे काय? दररोजचा व्यवस्थापन खर्चही करावाच लागतो. यामुळे जर दूध संघांनी गायीचे दूध नाकारले तर मोठी बिकट अवस्था येणार आहे. यामुळे दूध उत्पादक संतप्त झाले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...