agrowon news in marathi, milk producers agitation, Maharashtra | Agrowon

दुध आंदोलनाची धग कायम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम होती. खासदार राजू शेट्टी यांनी रस्त्यावर उतरून गुजरातमधून येणारे अमुलचे टॅंकर माघारी पाठविल्यामुळे मुंबईकरांना दूध टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत दिल्लीत विशेष बैठक घेऊन दूधप्रश्नावर विविध उपायांची चाचपणी केली. आजही या प्रश्नावर बैठक होणार आहे.   

पुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम होती. खासदार राजू शेट्टी यांनी रस्त्यावर उतरून गुजरातमधून येणारे अमुलचे टॅंकर माघारी पाठविल्यामुळे मुंबईकरांना दूध टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत दिल्लीत विशेष बैठक घेऊन दूधप्रश्नावर विविध उपायांची चाचपणी केली. आजही या प्रश्नावर बैठक होणार आहे.   

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसदेखील गावोगावी स्वाभिमानीचा बिल्ला दिसताच अटक करीत असून दूध वाहतूक करणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुंबईला पिशवीबंद दुधाचा नेहमीचा पुरवठा ५५ लाख लिटर्सचा होत नसून ३५ ते ४० लाख लिटर्सचा होतो. किमान ८० लाख लिटर्सचा स्टॉक मुंबईत असून गेल्या दोन दिवसांत चार लाख लिटर्स जादा दूध आले आहे. त्यामुळे अजून दोन दिवस मुंबईला टंचाई जाणवणार नाही.

आंदोलन गुरुवारपर्यंत रेटण्याची तयारी
राज्यात सर्वात जास्त दूध संकलन पुणे विभागात होते. आंदोलनामुळे रोजचे ६६ लाख लिटर्स दूध संकलन २२ लाख लिटरवर आले आहे. मात्र, वितरणदेखील २२ लाखांच्या आसपास नेहमी असल्यामुळे पुणे विभागात टंचाई जाणवली नाही. या विभागात ४० लाख लिटरचा साठा असल्याचे दुग्धविकास विभागाचे म्हणणे आहे. युती सरकारला झुकविण्यासाठी राजधानीचा अर्थात मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरू केले होते. मात्र, पहिल्या दिवशी अनेक भागांमधून पोलिस बंदोबस्तात दुधाचे टॅंकर मुंबईत गेले. शिल्लक साठा आणि नवा पुरवठा यामुळे मुंबईकरांना पहिल्या दिवशी टंचाई जाणवली नाही. त्यामुळे खा. शेट्टी स्वतः मंगळवारी रस्त्यावर उतरले. मुंबईची दूध कोंडी करण्यासाठी किमान गुरुवारपर्यंत आंदोलन रेटण्याची तयारी स्वाभिमानीने केली आहे.

अमुलचे टॅंकर गुजरातला माघारी फिरले 
"राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा सुरू आहे. त्यामुळे पाच रुपये दरवाढ जाहीर झाल्याशिवाय गुजरातमधून थेंबभरसुद्धा दूध आम्ही मुंबईत जाऊ देणार नाही, असे खासदार शेट्टी यांनी घोषित करून अमुलचे दोन टॅंकर अडविले. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात टॅंकर पुन्हा गुजरातला निघून गेले.

आंदोलनच्या दुसऱ्या दिवशीदेखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर पोलिसांना जेरीस आणले. दुधाचे टॅंकर फोडणे, रस्त्यावर दूध ओतून देणे, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा काढणे, पोलिसांना गुंगारा देत हायवे अडविणे अशा पध्दतीने आंदोलन सुरू होते. स्वाभिमानीचा बालेकिल्ला व दुधाचे महाराष्ट्राचे माहेरघर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीदेखील दूध उत्पादक संस्थांनी संकलन बंद ठेवले. वारणाच्या दूध टॅंकरला शेतकऱ्यांनी लक्ष्य केले. सोमवारी टॅंकर फोडूनही वारणा दूध संघ पुन्हा पोलिस बंदोबस्तात दुधाची वाहतूक करीत असल्याचे पाहून सेतकरी संतप्त झाले. त्यांनी शिरोळच्या उदगाव भागात वारणाच्या सहा गाड्या फोडून निषेध व्यक्त केला.

पुण्यात स्वाभिमानीचा हंगामा
स्वाभिमानीने वारंवार आवाहन करूनदेखील गोकुळ दूध संघाकडून मुंबईला दूध पाठविले जात असल्याबद्दल स्वाभिमानीने दुसऱ्या दिवशीही गोकुळच्या दूध गाड्यांवर हल्लाबोल केला. कोल्हापूरच्या शाहुवाडीतील सरूडमध्ये गोकुळचे तीन टॅंकर फोडण्यात आले. पुण्यात देखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केला. हडपसर भागात पोलिस बंदोबस्तात असलेले गोकुळचे टॅंकर हल्लाबोल करून फोडण्यात आले. शिवाजीनगर, पिंपरी भागात देखील अमुलचे टॅंकर फोडण्यात आले.

दूध आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरला दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे मुंबई-विजापूर महामार्ग ठप्प झाला होता. सांगलीच्या आसद भागात शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावर शेतकऱ्यांनाच दुधाची अंघोळ घातली व रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त केला. या भागातून रोजचे पाच हजार लिटर्स दूध संकलन बंद ठेवण्यात आले आहे.

राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे दूध उत्पादन असलेल्या नगर जिल्ह्यातदेखील बहुतेक गावांमध्ये दूध संकलन बंद ठेवले गेले. नगर-औरंगाबाद रस्त्यावर इमामपूर घाटात वाहनातील दूध स्वाभिमानीच्या कार्यकत्यांनी ओतून दिल्याने पोलिसांची धावपळ झाली.

मराठवाड्यात शाळकरी मुलेही आंदोलनात
दूध आंदोलनाचे मराठवाड्यातदेखील पडसाद उमटत राहिले. बुलडाणा शहरात राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांची धरपकड केली. बीडच्या पाली, कडा भागात शाळकरी मुले, वयोवृध्द शेतकरी देखील रस्त्यावर उतरले. त्यांनी हैद्राबादकडे जाणारा अमुलचा २० हजार लिटरचा टॅंकर फोडला. त्यामुळे रस्त्यावर दुधाचे पाट वाहू लागले होते.

जालना जिल्ह्यात जाफराबादला दूध वाहतूक करणारी सर्व वाहने कार्यकर्त्यांनी रोखून धरली आणि रस्त्यावर दूध सोडून दिले. नांदेडच्या अर्धापूर भागात गरिबांना दूध वाटप करतानाच पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कार्यकर्त्यांनी देखील प्रतिकार न करता पोलिसांना सहकार्य केले. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे राज्यातील विविध दूध संघ व खासगी डेअरींकडे दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. सव्वा दोन लाख लिटर दुधाचे संकलन असलेल्या कात्रजचा पुरवठा ६५ हजार लिटरने घटला. बारामती तालुका दूध संघाचे संकलन एक लाख लिटरने घटले. या संघाचे एरवी संकलन अडीच लाख लिटर असते.

गोकुळचे संकलन घटले
राज्यातील सर्वात मोठ्या कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन ५ लाख लिटर्सने घटले आहे. १२ लाख लिटर्सपेक्षा जास्त दूध संकलन करणाऱ्या गोकुळला आंदोलनामुळे ४० टक्के दूध संकलन करता आलेले नाही. "मुंबईला आम्ही ८ लाख लिटर्स दूध पाठवतो. मात्र, दोन दिवसांत पोलिसांची मदत घेऊन पाच लाख लिटर्स दूध पाठवता आलेले आहे. अर्थात, आंदोलन सुरू राहिल्यास पुढील दोन दिवसांनंतर वितरणाला मोठा फटका बसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्तर महाराष्ट्रात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. शहादा तालुक्यात कार्यकर्त्यांनी दुधाची वाहने अडवून महादेवाला अभिषेक केला. तसेच, गाड्यांमधील दूध गरिबांना वाटून टाकले.

रिलायन्स, पतंजलीची वाट पाहू नका
राज्यात एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे, अशी टीका विरोधकांनी विधिमंडळात केली. ‘दुधाचा शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्स आणि आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का,’ असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. राज्यातील बहुतेक राजकीय पक्षांनी दूध बंद आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या मोठ्या पक्षांकडून आंदोलनाला कुठेही विरोध न झाल्यामुळे भाजपची कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते.
दुधाला प्रतिलिटर ५ रुपये थेट अनुदान द्या, दूध भुकटी निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढ करा, हे अनुदान दोन महिन्यांसाठी नव्हे, तर सहा महिन्यांसाठी कायम ठेवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

पांडुरंगाने दोघांनाही सुबुद्धी द्यावी : नरके
दुधाचा प्रश्न खरे तर महादेव जानकर यांनीच चिघळवला. मात्र, दोन वर्षांपासून इंडियन डेअरी असोसिएशनकडून या संकटाची माहिती दिली जात असताना मुख्यमंत्री तसेच शेतकरी संघटनांनीदेखील दुर्लक्ष केले, अशी टीका गोकुळचे संचालक अरुण नरके यांनी केली. "आता शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असला तरी पांडुरंगाने सरकार आणि आंदोलकांना मधला मार्ग काढण्याची सुबुद्धी द्यावी. शेतकऱ्यांचे अजून नुकसान करू नका, अशी कळकळीची विनंती श्री. नरके यांनी केली.

चर्चेला निमंत्रण दिले नाहीः तुपकर
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी हालाखीच्या स्थितीत आहे. मात्र, सरकारने राजकारण न करता संवेदनशीलता दाखवून तातडीने दूधदराचा प्रश्न सोडवावा. चर्चेला न बोलविणारे सरकार या आंदोलनाला हिंसक वळण देण्याच्या तयारीत आहे. हा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास दुधाचे टॅंकर रिकामे करणारे शेतकरी आता मंत्र्यांनाही दुधाने अंघोळ घालतील, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिले आहे.

आम्ही चर्चेला कधीही तयार आहोत. स्वाभिमानीच्या आंदोलनाचा इतिहास पाहिल्यास आम्ही सतत चर्चेने प्रश्न सोडविले आहेत. दूधदराच्या आंदोलनाबाबत मात्र चर्चेला आम्ही येत नसल्याची आवई सरकारने उठविली आहे. आम्ही मानसन्मानाचे भुकेले नाहीत. हवे तर सरकारने एकतर्फी दरवाढ घोषित करावी. आम्ही आंदोलन मागे घेऊ, असे श्री. तुपकर म्हणाले.

आंदोलनातील क्षणचित्रे

 •  दुसऱ्या दिवशीही आंदोलनाची तीव्रता कायम
 •  कार्यकर्त्यांना आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना
 •  पोलिसांची ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांवर कारवाई
 •  दुसऱ्या दिवशी खासदार 
 •     राजू शेट्टी रस्त्यावर
 •  अमुलचे दूध टॅंकर गुजरातला माघारी पाठविले
 •  मराठवाड्यात शालेय मुले, वयोवृद्धही आंदोलनात
 •  विधिमंडळात दुसऱ्या 
 •     दिवशीही पडसाद
 •  केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठक
 •  आंदोलक मागण्यांवर ठाम
 •  गनिमीकाव्याने प्रशासन हवालदिल

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...