agrowon news in marathi, Milk rate cut by private dairies, Maharashtra | Agrowon

खासगी डेअरीचालकांनी दुधाचे विक्री दर घटविले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 जून 2018

पुणे: आंतरराष्ट्रीय पातळीवरील दूध पावडच्या घसरलेल्या दरानंतर सरकार काहीतरी मदत करेल, या आशेवर असलेल्या खासगी दूध डेअरी व्यावसायिकांची निराशा झाली. त्यानंतर दुधाचे खरेदी दर कमी झाल्यामुळे विक्रीचे दरदेखील प्रतिलिटर चार रुपयांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील आघाडीच्या खासगी दूध डेअरीचालकांनी घेतली आहे. 

पुणे: आंतरराष्ट्रीय पातळीवरील दूध पावडच्या घसरलेल्या दरानंतर सरकार काहीतरी मदत करेल, या आशेवर असलेल्या खासगी दूध डेअरी व्यावसायिकांची निराशा झाली. त्यानंतर दुधाचे खरेदी दर कमी झाल्यामुळे विक्रीचे दरदेखील प्रतिलिटर चार रुपयांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील आघाडीच्या खासगी दूध डेअरीचालकांनी घेतली आहे. 

राज्यात अंदाजे ८० लाख लिटर्स दुधाची खरेदी खासगी डेअरीचालकांकडून केली जाते. त्यातील ६० लाख लिटर्स दुधाची पिशवीतून विक्री होते. विविध अशा ७० ब्रॅंडखाली पिशवीबंद दूध विकले जात असून आतापर्यंत त्यातील नामांकित १५ ब्रॅंडने आपल्या दुधाचे विक्री दर घटविले आहेत. 

बारामतीमध्ये राज्यातील प्रमुख डेअरीचालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे ग्राहकांना गायीचे दूध आता प्रतिलिटर सरासरी ४० ते ४२ रुपयांऐवजी ३६ ते ३८ रुपये दराने मिळणार आहे. ‘‘दूध खरेदीदर वाढविणे शक्य नसल्याने कमी झालेल्या दराचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी विक्री दर कमी करण्याचा विचार हाेता. कमी केलेल्या सुधारित दराप्रमाणे येत्या १६ जूनपासून ग्राहकांना स्वस्तात दुधाची विक्री सुरू होईल. यामुळे राज्यातील पिशवीबंद दुधाची विक्री वाढेल. राज्यात ७० खासगी डेअरी असून, टप्प्याटप्प्याने सर्वांनी विक्री दर कमी केले तर दुधाची विक्री वाढुन, अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न कमी हाेईल.’’, असे महाराष्ट्र राज्य राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. 

‘‘गेल्या काही दिवसांपासून दूध भुकटीचे दर कोसळल्याने डेअरीचालकदेखील अडचणीत आलेले होते. त्यामुळे खरेदीचे दर कमी झाले होते आणि शेतकऱ्यांना दर वाढवून देण्याची मागणी होत असतानाही तसे करणे शक्य होत नव्हते. तसेच, दुसऱ्या बाजूला दूधविक्रीचे कमिशन आणि दूध विक्रेत्यांना विविध स्किमदेखील चालू होत्या. त्यामुळे या सर्व समस्यांवर उपाय म्हणून डेअरीचालकांनी विक्रीचे दर कमी मार्ग स्विकारला आहे", असेही श्री. कुतवळ म्हणाले. 

पहिल्या टप्प्यात सोनई, गोविंद, स्वराज, ऊर्जा, किसान, नेचर, स्वयंभू, शांताई, अनंत, शिवप्रसाद, जे. डी. थोटे, नॅचरल, कन्हैया, गोशक्ती असे ब्रॅंडने दुधाचे दर कमी करण्यास संमती दर्शविली आहे. खासगी डेअरीचालकांनी दुधाचे दर कमी केल्यामुळे अमूल तसेच इतर सहकारी संघांच्या दुधाचे ब्रॅंडदेखील आपल्या किमती घटवतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गायीच्या दुधाचे डेअरीपोच दरदेखील घटले
दूध उत्पादक शेतकरी विनोद कोडीतकर यांनी सांगितले, की मंगळवारपासून काही डेअरीचालकांनी शेतकऱ्यांकडून डेअरी पोहच दुधाचे दर अजून दोन रुपयांनी कमी केले आहेत. शेतकऱ्यांकडून त्यामुळे १७ रुपयांनी खासगी संकलक खरेदी करून त्याची विक्री डेअरीचालकांना २० रुपयांनी करीत आहेत. यापूर्वी २० रुपयांनी शेतकऱ्यांकडून संकलक खरेदी करीत होते व त्याची विक्री डेअरीचालकांना २१ ते २१.५० केली जात होती.

इतर अॅग्रो विशेष
मिर्झापूर ः साखळी शेततळ्यांचे गाव‘मागेल त्याला शेततळे` योजनेअंतर्गत मिर्झापूर (ता...
इजा झाल्यानंतर वनस्पती पाठवतात धोक्याचा...जेव्हा वनस्पतींना इजा होते, त्या वेळी वनस्पतीच्या...
ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...नागपूर  ः ठिबक नोंदणीवरील विक्रेत्यांच्या...
कमी दाब क्षेत्राचे निर्माण; पावसाच्या...पुणे   : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यातपुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी...
चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली...सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा...
सोयाबीनवरील पाने खाणाऱ्या अळ्या व...सध्या सोयाबीन पीक काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या व...
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमीवाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने...
राज्यातील विकास सोसायट्यांना रिक्त...सांगली ः राज्यातील विकास सोसायट्यांची संख्या २१...
पावसाच्या तुरळक हजेरीने हलका दिलासापुणे: पावसाच्या दीर्घ खंडानंतर राज्यात दोन...
पुण्यात एक ऑक्टोबरला ‘कृषी कल्चर’ ज्ञान...पुणे ः शेतीमधील बदलत्या तंत्रावर प्रकाश टाकणारा...
पोटॅशचा मोठा तुटवडाजळगाव  ः रेल्वेकडून खत पुरवठादार किंवा खत...
नोकरी गमावली पण रेशीम शेतीतून पत कमावलीसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर...
राज्यात उद्यापासून पावसाचे संकेतपुणे: बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी...
कीडनाशकांबाबतच्या याचिकेची सर्वोच्च...नवी दिल्ली ः मानवी आरोग्याला धोकादायक व भारतात...
स्वेच्छानिवृत्तीनंतरही प्रयोगशील...सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील...
महाराष्ट्रात भावांतर योजना लागू...परभणी ः शेती एवढ्या समस्या कुठेच नाहीच. सर्व...
तयारी रब्बी हंगामाची...खरीप पिकांच्या काढणीनंतर रब्बी हंगामासाठी...
ऊसदर नियंत्रण समितीची पहिली बैठक...मुंबई : ऊसदर नियंत्रण समितीची बैठक सोमवारी (ता.१७...
डाळिंब उत्पादनात घट होण्याची शक्यतासांगली ः राज्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे...