agrowon news in marathi, minimum temperature increased by two percent , Maharashtra | Agrowon

राज्यात कमाल तापमानात दोन अंशांपर्यंत वाढ
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे: राज्यातील अनेक भागांत माॅन्सूनने उघडीप दिल्याने कमाल तापमानाचा पारा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये उच्चांकी ४०.० अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे: राज्यातील अनेक भागांत माॅन्सूनने उघडीप दिल्याने कमाल तापमानाचा पारा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव येथे गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये उच्चांकी ४०.० अंश सेल्सिअसची उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यातील माॅन्सूनची गती थंडावली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात ऊन सावल्याचा खेळ सुरू आहे. त्यामुळे दुपारी वातावरणात उकाडा वाढत आहे. परिणामी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे. येत्या सोमवार ते मंगळवारपर्यत राज्यातील पावसाची गती मंदावणार आहे. त्यानंतर वातावरणात पोषक हवामान तयार झाल्यास कोकण परिसरात अधूनमधून हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.  

गेल्या चोवीस तासामध्ये पावसाने उघडीप दिल्याने गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही. ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा खाली उतरला असला तरी पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा हळूहळू वाढू लागला आहे.

विदर्भातील बुलढाणा येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसने वाढ होत ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, सांताक्रुझ, रत्नागिरी, डहाणू, औरंगाबाद येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. तसेच उर्वरित भागात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. 

तीन-चार दिवस माॅन्सून संथच राहणार 
सध्या पोषक वातावरण नसल्याने माॅन्सूनची गती संथच राहणार आहे. पुढील तीन ते चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. पुढील आठवड्यात माॅन्सूनच्या प्रगतीत किंचित वाढ होऊन राज्यात पुन्हा माॅन्सून सक्रिय होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर पावसाच्या हलक्या बरसतील अशी शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

गुरुवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई ३२.२,  सांताक्रूझ ३४.०, अलिबाग ३३.६, रत्नागिरी ३१.७,डहाणू ३२.८, पुणे ३२.६, नगर ३६.४, जळगाव ४०.०, कोल्हापूर ३०.९, महाबळेश्वर २१.५, मालेगाव ३८.२, नाशिक ३२.६, सांगली ३२.२, सातारा ३१.३, सोलापूर ३५.३, औरंगाबाद ३६.५, उस्मानाबाद ३३.४, परभणी शहर ३६.९, नांदेड ३५.०, अकोला ३८.६, अमरावती ३७.०, बुलढाणा ३८.२, ब्रम्हपुरी ३७.५, चंद्रपूर ३९.०, गोंदिया ३७.०, नागपूर ३७.७, वाशीम ३७.०, वर्धा ३७.९, यवतमाळ ३६.५.

इतर अॅग्रो विशेष
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...