agrowon news in marathi, monsoon active in country, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनच्या वाऱ्यांची जोरदार मुसंडी; देशाच्या बहुतांश भागांत दाखल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) जोरदार मुसंडी घेत बुधवारी (ता. २७) मोठा पल्ला पूर्ण केला आहे. वायव्य भारताचा भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात मॉन्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, जम्मू- काश्‍मीर या राज्यांचा संपूर्ण भाग व्यापून उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाबपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) जोरदार मुसंडी घेत बुधवारी (ता. २७) मोठा पल्ला पूर्ण केला आहे. वायव्य भारताचा भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात मॉन्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, जम्मू- काश्‍मीर या राज्यांचा संपूर्ण भाग व्यापून उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाबपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

विदर्भाच्या पूर्व भागात दखल होत मॉन्सूनने बुधवारी (ता. २७) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मेडन जुलियन आॅस्सिलेशनची स्थिती अनुकूल नसल्याने मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने मॉन्सूनची वाटचाल यंदा धीम्या गतीने झाली. महाराष्ट्राचा निम्मा भाग व्यापल्यानंतर (११ जून) मॉन्सूनची वाटचाल झाली नव्हती. शनिवार (ता. २३) व रविवारी (ता. २४) जून रोजी दोन दिवस सलग वाटचाल करत मॉन्सूनने विदर्भ वगळता, महाराष्ट्राचा बहुतांशी भागात प्रगती केली होती. 

पूर्व भारतातून वाटचाल सुरू झाल्यानंतर मॉन्सूनने चांगला वेग धरला आहे. २५ जून रोजी पुढील प्रवास सुरू केल्यानंतर अवघ्य तीन दिवसांमध्ये मॉन्सूनने संपूर्ण पूर्व भाग व्यापून, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाबच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. माॅन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान असल्याने शुक्रवारपर्यंत २९ जून राजस्थानचा उर्वरित भाग, पश्‍चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाना, दिल्ली, चंडीगडपर्यंत मॉन्सून पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...