agrowon news in marathi, monsoon active at Karnatka and Telangane, Maharashtra | Agrowon

कर्नाटक, तेलंगणात मॉन्सून सक्रिय
वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

नवी दिल्ली ः देशात मॉन्सूनची वाटचाल काहीशी मंदावली आहे. मॉन्सून कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ राज्यांमध्ये सक्रिय झाला आहे. तसेच किनारी कर्नाटक, मध्य कर्नाटक, केरळ, तेलंगणा, लक्षद्वीप, रायलसिमा आणि तामिळनाडू व किनारी आंध्र प्रदेशात जोरदार पाऊस सुरू आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

नवी दिल्ली ः देशात मॉन्सूनची वाटचाल काहीशी मंदावली आहे. मॉन्सून कर्नाटक, तेलंगणा आणि केरळ राज्यांमध्ये सक्रिय झाला आहे. तसेच किनारी कर्नाटक, मध्य कर्नाटक, केरळ, तेलंगणा, लक्षद्वीप, रायलसिमा आणि तामिळनाडू व किनारी आंध्र प्रदेशात जोरदार पाऊस सुरू आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली. 

कर्नाटकमध्ये किनारी भागात जोरदार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर आले आहेत. सोमवारी (ता. ११) किनारी भागात सकाळपासूनच पाऊस सुरू होता. पावसाचा जोर एवढा होता की बंगळूर ते मंगलोर रेल्वे गाडी बंद करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. मालनाद खोऱ्यातील सर्व नदी, नाले आणि तलाव पाण्याचे पूर्ण भरले आहेत. तर भद्रा नदी दुथडी भरून वाहत होती. पावसाचा जोर एवढा होता की रस्त्यांवर तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. दक्षिण कन्नड, उडपी, करवार आणि मंगलुरु जिल्ह्याला पावसाचा जास्त फटका बसला. बेळगाव जिल्ह्यातही पावासाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळित झाले होते.       

कर्नाटकच्या अनेक भागांत सुरू असलेल्या पावसामुळे कावेरी नदीच्या पात्रात पाणी वाढले आहे. नदी पात्राची शेती ही पाण्याखाली जाण्याची भीती आहे. पावसामुळे या भागातील शेतीत पाणी साचून शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. तेलंगणा राज्यातही मॉन्सून सक्रीय झाला असून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. सोमवारी तेलंगणाच्या दक्षिण भागात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. तर वादळाने काही ठिकाणी जनजीवन विस्कळित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...
जळगावमधील ग्रामपंचायतींचा डिजिटल...जळगाव  ः ग्रामपंचायतींमध्ये संगणकावरील विविध...
पुणे जिल्ह्यात ७१ लाख टन ऊस गाळपपुणे   ः जिल्ह्यात १७ साखर...
नगर जिल्ह्याचे विभाजन होणारच ः...नगर  ः नगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे, ही...
पंधरा दिवसांपूर्वीच संपला नगरमधील पाच...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये चाराटंचाई अंधिक तीव्र होत...
वीज दरवाढ रद्दबाबतचे परिपत्रक...शिरोली पुलाची, जि. कोल्हापूर : वीज दरवाढ...
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांसाठी परभणीत...परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी,...
हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार...मुंबई   : हरकती असलेल्या जमिनी...
मराठवाडा, खानदेशात ४९ लाख टन ऊसगाळपऔरंगाबाद : यंदाच्या हंगामात मराठवाडा व खानदेशातील...