agrowon news in marathi, monsoon in Arabian Sea today, Maharashtra | Agrowon

मॉन्सून आज अरबी समुद्रात
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 मे 2018

पुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २९) केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सून धडक देण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल झाले आहे. वाटचालीस पोषक वातावरण असल्याने रविवारी (ता. २७) अंदमान-निकोबार बेटांसह बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २९) केरळ आणि तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सून धडक देण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

देशातील शेतकऱ्यांसह सर्वच वर्गाचे लक्ष लागून असलेला माॅन्सून अंदमानात दाखल झाला. शुक्रवारी मॉन्सूनने दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटांपर्यंत मजल मारली आहे. नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने अंदमानात आलेल्या मॉन्सूनची वाटचाल काहीशी वेगाने होण्याचे संकेत अाहेत. रविवारी अरबी समुद्राचा काेमोरीन भाग, मालदीव बेटांच्या परिसरात मॉन्सून दाखल होईल. तर मंगळवारपर्यंत मॉन्सून केरळमधून देशात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

सोमवारी (ता. २८) बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत अाहेत. केरळ किनाऱ्यालगच्या अरबी समुद्रात २.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे लक्षद्वीप बेटे, केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर दाट ढगाांचे अच्छादन तयार झाले असून, या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. लक्षद्वीप आणि केरळ किनाऱ्यावर तीन ते साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

‘मेकुणू’ जमिनीवर
अरबी समुद्रात आलेले ‘मेकुणू’ हे अतितीव्र चक्रीवादळ शुक्रवारी मध्यरात्री ओमानच्या किनाऱ्याला धडकले. शनिवारी सकाळी हे चक्रीवादळ जमिनीवर आले असून, त्याची तीव्रता वेगाने कमी होत आहे. सलालाहच्या पश्‍चिमेकडे १०० किलोमीटर अंतरावर असलेले चक्रीवादळ वायव्य दिशेकडे सरकत आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत वादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर कमी दाबाचे क्षेत्रात होईल, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
राज्यात हुडहुडी वाढली... पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने राज्यात...
धार्मिक स्थळांनी द्यावा दुष्काळासाठी...नागपूर ः राज्यातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळांनी...
चारा छावण्यांऐवजी थेट अनुदानाचा विचार ः...मुंबई ः दुष्काळी भागात चारा छावण्यांमध्ये होणारा...
देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार...पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी...
खरेदी न झालेल्या हरभरा, तुरीसाठी...सोलापूर : हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांनी हरभरा व तूर...
दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘...लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ...
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...