मॉन्सून सक्रिय होण्यास प्रारंभ

माॅन्सून
माॅन्सून

पुणे  ः अरबी समुद्र आणि हिंदी महासागर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मॉन्सूनला सक्रिय करण्यासाठी ही स्थिती पोषक आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.   राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या कोकणच्या दक्षिण भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच महाराष्ट्र ते केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण कोकण ते बिहार यादरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती छत्तीसगड आणि तेलंगण, उत्तर प्रदेश या भागातही तयार झाली आहे. त्यामुळे मॉन्सून सक्रिय होऊन हळूहळू पुढे सरकेल.   शेतकऱ्यांना आतुरतेने वाट पाहिला लावणारा माॅन्सून पुन्हा सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी (ता.२१) दुपारनंतर पुणे शहरासह कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडला. बुधवारी (ता.२०) कोकणातील मालवण, वेंगुर्ला, राजापूर, मापुसा, देवगड, कुडाळ, पेरणी, सावंतवाडी, गुहागर, रत्नागिरी अशा तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून, विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या सोमवार (ता.२५) पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आज (ता.२२) कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोकण गोवा व विदर्भात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे परिसरातही आकाश सामान्यत ढगाळ राहील; तसेच काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे.  गुरुवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांतील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)  : मुंबई ३२.८,  सांताक्रूझ ३२.९, अलिबाग ३१.७, रत्नागिरी ३०.८, डहाणू ३४.२, पुणे ३४.२, नगर ३६.७, जळगाव ३८.०, कोल्हापूर ३१.४, महाबळेश्वर २६.२,  मालेगाव ३८.०, नाशिक ३५.१, सांगली ३२.०, सातारा ३४.०, सोलापूर ३६.९, औरंगाबाद ३३.७, परभणी शहर ३७.७, नांदेड ३६.०, अकोला ३७.९, बुलडाणा ३६.०, ब्रह्मपुरी ३८.८, गोंदिया ३७.३, नागपूर ३८.०, वर्धा ४०.१, यवतमाळ ३७.०. गुरुवारी (ता.२१) सकाळपर्यंत प्रमुख शहरांमध्ये पडलेला पाऊस ः मिलिमीटर  कोकण ः मालवण ३५०, वेंगुर्ला ३२०, राजापूर २६०, मापुसा २२०, देवगड १९०, कुडाळ, पेडणे, सावंतवाडी १७०, गुहागर, रत्नागिरी १५०, मार्गगोवा, मोरगाव ११०,  कणकवली, मडगाव ९०, खेड ८०, पोडा ७०, संगमेश्वर देवरुख, वाल्पोई ६०. मध्य महाराष्ट्र ः राधानगरी ५०, अंमळनेर, जावळीमाथा, खटाव, वडुज, नंदुरबार, ओझर, शाहूवाडी, शिराळा, तळोदा ३०, बारामती, इगतपुरी, कराड, कर्जत, खंडाळा बावडा, कोल्हापूर २०, आटपाडी, बार्शी, चांदवड, एरंडोल, गगनबावडा, काडगाव, कोरेगाव, महाबळेश्वर, पाचोरा, येवला १० मराठवाडा ः सेलू ५०, अहमदपूर, आष्टी ४०, मानवत, परळी वैजनाथ ३०, अंबड, भूम, जिंतूर, नायगाव, खैरगाव, वाशी २०, अंबेजोगाई, बीड, बिलोली, घनसांगवी,  जळकोट, काज, लातूर, परभणी, रेणापूर, सेनगाव १०  विदर्भ ः मूर्तिजापूर ९०, अमरावती ७०, बार्शी टाकळी ६०, अकोला ५०, अंजनगाव, चिखलदरा, दिनापूर, कांरजा लाड, मंगळूरपीर, मोहाडी, नांदगाव काजी, परतवाडा, पुसद, रामटेक ३०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com