agrowon news in marathi, monsoon cover all india, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला
टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 जून 2018

पुणे: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) वेगवान प्रगती करत गुजरात, राजस्थानच्या उर्वरित भागांसह संपूर्ण देश व्यापला आहे. साधारणत: १५ जुलै रोजी संपूर्ण देशात पोचणाऱ्या मॉन्सूनने यंदा १६ दिवस आधीच देशभरात मजल मारली आहे. मॉन्सूनचे देशभरातील अस्तित्व दाखविणारा कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रॅक) जैसलमेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे: नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) वेगवान प्रगती करत गुजरात, राजस्थानच्या उर्वरित भागांसह संपूर्ण देश व्यापला आहे. साधारणत: १५ जुलै रोजी संपूर्ण देशात पोचणाऱ्या मॉन्सूनने यंदा १६ दिवस आधीच देशभरात मजल मारली आहे. मॉन्सूनचे देशभरातील अस्तित्व दाखविणारा कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रॅक) जैसलमेरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

यंदा माॅन्सूनची वाटचाल कधी वेगाने तर कधी खूपच धीम्या गतीने झाली. महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने वाटचाल तब्बल दोन आठवडे थांबली होती. मात्र प्रवाह सुरळीत होताच वेगाने प्रगती करत मॉन्सूने सर्वसाधारण वेळेच्या (१५ जुलै) तब्बल १६ दिवस अगोदर देशाचा सर्व भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी मॉन्सूनने यंदा अंदमान समुद्रातील आगमन पाच दिवस उशिराने (२५ जून) केले. त्यानंतर मात्र नियमित वेळेच्या तीन दिवस आधी केरळात धडक देत देवभूमीत प्रवेश केला.

३० मे रोजी मॉन्सूनने संपूर्ण केरळ व्यापून कर्नाटकाच्या किनारपट्टीच्या भागात प्रगती केली. बंगालच्या उपसागरातून धीम्या गतीने वाटचाल करणाऱ्या मॉन्सूनची अरबी समुद्रावरील प्रगती मंदावली. तब्बल आठवडाभरापेक्षा अधिक कालावधीनंतर ८ जून रोजी महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात एकाच दिवशी दाखल झालेल्या मॉन्सूनने दुसऱ्याच दिवशी (९ जून) निम्मा महाराष्ट्र व्यापला. त्याच वेळी मेडन जुलिअन ऑस्सिलेशय या हवामान स्थितीच्या प्रतिकूल स्थितीमुळे विषुववृत्ताकडून येणारे वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने मॉन्सूनची वाटचाल थांबली.  

मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागला त्यानंतर २३ जून रोजी मॉन्सूनने मध्य महाराष्ट्र, कोकणातून वाटचाल सुरू केली. त्यांनतर मात्र मॉन्सूनने सातत्याने प्रवास सुरू ठेवला. २७ जून रोजी मोठा टप्पा पूर्ण करून देशाच्या बहुतांशी भागात पोचलेल्या मॉन्सूनने आज (ता. २९) देश व्यापला. २०११ पासूनची वाटचाल पाहता यापूर्वी २०१३ मध्ये सर्वसाधारण वेळेच्या तब्बल एक महिना आगोदर (१६ जून) आणि २०१५ मध्ये २६ जून रोजी मॉन्सूनने देश व्यापला होता. 

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनने देशभरातील वाटचाल...

वर्ष मॉन्सूनने देश व्यापल्याच्या तारखा..
२०११ ९ जुलै
२०१२ ११ जुलै
२०१३ १६ जून
२०१४ १७ जुलै
२०१५ २६ जून
२०१६ १३ जुलै
२०१७ १९ जुलै
२०१८ २९ जून

 

 

इतर अॅग्रो विशेष
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...