मॉन्सून आज केरळात धडकणार ?
मॉन्सून आज केरळात धडकणार ?

मॉन्सून आज केरळात धडकणार ?

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) सोमवारी (ता. २८) प्रगती करत भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या कोमोरीन भागात धडक दिली. केरळच्या दक्षिणेकडे देशाच्या उंबरठ्यावर मॉन्सून पोचला आहे. बंगालच्या उपसागरातही संपूर्ण अंदमान बेटसमूहासह मोठा पल्ला पार केला आहे. मंगळवारी (ता. २८) मॉन्सून देवभूमी केरळ, तामिळनाडूच्या काही भागात दाखल होण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  अंदमानात नियमित वेळेच्या सुमारे पाच दिवस उशिराने (२५ जून) दाखल झालेल्या माॅन्सूनने वेगाने प्रगती सुरू ठेवली आहे. रविवारी (ता. २७) अंदमान बेटांच्या बहुतांशी भागासह श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली तर दुसऱ्याच दिवशी साेमवारी श्रीलंकेचा बहुतांशी भाग व्यापून केरळच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंतचा टप्पा पुर्ण केला. दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव - कोमोरीन परिसर, बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग, पूर्वमध्य, अग्नेय भागामध्ये मॉन्सून दाखल झाला आहे.  अरबी समुद्रात असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढल्याने मॉन्सूनच्या प्रगतीस चाल मिळाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मॉन्सून कोमोरीन-मालदीवचा उर्वरीत भाग, लक्षद्वीप बेटे, केरळ आणि तामिळनाडूच्या काही भाग, मध्य बंगालच्या उपसागरात दाखल होण्यास अनुकल स्थिती आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३१) मॉन्सून संपूर्ण केरळ व्यापून कर्नाटकची किनारपट्टी व अंतर्गत भागात दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  कमी दाबाची दोन क्षेत्रे सक्रिय अरबी समुद्रात केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यावर रविवारी निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र सोमवारी ठळक झाले होते. त्यामुळे या भागात ढगांची गर्दी वाढली होती. तर बंगालच्या उपसागरामध्ये पूर्वमध्य भागामध्ये सोमवारी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. उद्या त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यातच उत्तर केरळ आणि तामिळनाडू दरम्यान १२ अंश उत्तर अक्षांशादरम्यान समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर वाऱ्यांचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र सक्रिय अाहे. या पूरक स्थितीमुळे मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

माॅन्सूनची केरळला धडक : स्कायमेट मॉन्सूनने केरळला सोमवारी (ता.२८) धडक दिली असल्याचे स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने म्हटले आहे. केरळमध्ये मॉन्सूनसदृश स्थिती असल्याने देशात पावसाचा हंगाम सुरू झाला असल्याचे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंग यांनी सांगितले. तर बाहेर पडणाऱ्या दीर्घ किरणोत्सर्गी लहरी, दोन दिवस पडलेला पाऊस, वाऱ्यांची दिशा पाहता माॅन्सून केरळात दाखल झाल्याचे स्कायमेटचे उपाध्यक्ष महेश पालवत यांनी म्हटले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com