agrowon news in marathi, monsoon inter in Maharashtra, Maharashtra | Agrowon

मॉन्सूनची दे धडक !
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

पुणे : केरळमध्ये यंदा वेळेआधी हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रात माॅन्सून दाखल होण्यास करावी लागलेली प्रतीक्षा अखेर संपली. मृग नक्षत्रास शुक्रवारी (ता.८) प्रारंभ होताच मॉन्सूनचे महाराष्ट्रात दिमाखात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग माॅन्सूनने व्यापला आहे. आज (ता.९) मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग माॅन्सून व्यापणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : केरळमध्ये यंदा वेळेआधी हजेरी लावल्यानंतर महाराष्ट्रात माॅन्सून दाखल होण्यास करावी लागलेली प्रतीक्षा अखेर संपली. मृग नक्षत्रास शुक्रवारी (ता.८) प्रारंभ होताच मॉन्सूनचे महाराष्ट्रात दिमाखात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. राज्यात दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागात मॉन्सूनने धडक दिली असून रत्नागिरी, सोलापूर, नांदेडपर्यंतचा भाग माॅन्सूनने व्यापला आहे. आज (ता.९) मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग माॅन्सून व्यापणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मॉन्सून साधारणत: ७ जून रोजी तळकोकणातून महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मॉन्सून ६ ते ८ जूनच्या दरम्यान राज्यात दाखल होईल, असे हवामान विभागाने यापूर्वी जाहीर केले होते. त्याप्रमाणे शुक्रवारी (ता.८) मॉन्सूनने हजेरी लावली. अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीलागत हवेचा कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) सक्रिय असल्याने त्यामुळे माॅन्सूनचे आगमन प्रभावित झाले होते.

केरळात नियोजित वेळेच्या (१ जून) तीन दिवस आधीच (२९ जून) धडक देणाऱ्या मॉन्सूनने महाराष्ट्रापर्यंतची वाटचाल पूर्ण करण्यास तब्बल ११ दिवसांचा कालावधी घेतला. गोवा, कर्नाटक आणि रायलसिमा उर्वरित भाग व्यापून शुक्रवारी मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्राच्या दक्षिण भागासह संपूर्ण तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशाच्या आणखी काही भागापर्यंत मजल मारली आहे. 

माॅन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने आज (शनिवारी) मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी काही भाग, संपूर्ण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाच्या आणखी काही भागात मॉन्सून धडक देईल; तर सोमवारपर्यंत (ता.११) मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून गुजरात, मध्य प्रदेशच्या काही भागात माॅन्सून पोचण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आज (ता.९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, ईशान्य भारतासह पश्‍चिम बंगाल, सिक्कीमध्येही मॉन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

कोकण, दक्षिण महाराष्ट्रात अतिवृष्टी
मॉन्सूनचे राज्यात आगमन झाल्याने मुंबईसह, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज (ता. ९) काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोमवारपर्यंत (ता. ११) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार असून, रविवारी (ता. १०) मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर सोमवारपर्यंत मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचे महाराष्ट्रातील आगमन

वर्ष    आगमन
२०११ ३ जून
२०१२    ६ जून
२०१३     ४ जून
२०१४    ११ जून
२०१५ ८ जून
२०१६    १९ जून
२०१७    १० जून
२०१८     ८ जून

 

इतर अॅग्रो विशेष
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...
'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌...गेल्या बावीस वर्षांपासून शाश्वत ग्रामीण...
दहशतवादी आणि त्यांच्या पाठिराख्यांना...पांढरकवडा : आपल्या लष्कराबद्दल आपल्याला गर्व आहे...
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...