agrowon news in marathi, monsoon on kokan door, Maharashtra | Agrowon

मॉन्सून कोकणच्या वेशीवर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 जून 2018

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ७) कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापून महाराष्ट्राच्या वेशीवर असलेल्या गोव्यापर्यंत धडक दिली आहे. गोव्यातील मार्मागोवा, कर्नाटकातील गदगपर्यंत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. आज (ता. ८) महाराष्ट्रातील मॉन्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या कोकणासह दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) गुरुवारी (ता. ७) कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी व्यापून महाराष्ट्राच्या वेशीवर असलेल्या गोव्यापर्यंत धडक दिली आहे. गोव्यातील मार्मागोवा, कर्नाटकातील गदगपर्यंत मॉन्सून पोचल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. आज (ता. ८) महाराष्ट्रातील मॉन्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या कोकणासह दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात माॅन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

बुधवारी (ता.६) मॉन्सूनने उत्तरेकडील प्रवास सुरू करत अांध्र प्रदेशच्या कर्नूल, नरसापूर, मच्छलीपट्टणमपर्यंतचा टप्पा पूर्ण केला होता. तर गुरुवारी मॉन्सूनने गोव्यापर्यंत मजल मारली आहे. आज शुक्रवारीअंतर्गत कर्नाटक, रायलसीमाचा उर्वरित भाग व्यापून मध्य अरबी समुद्र, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणच्या काही भागांत माॅन्सून दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे, तर शनिवारपर्यंत (ता. ९) महाराष्ट्र, तेलंगणच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल होईल, तर सोमवारपर्यंत (ता. ११) संपूर्ण महाराष्ट्र, अरबी समुद्राचा बहुतांशी भाग, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आेडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीमपर्यंत मॉन्सून पोचण्याचे संकेत आहेत. 

बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात आज (ता. ८) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. माॅन्सूनच्या उत्तरेकडील वाटचालीस या कमी दाब क्षेत्रामुळे गती मिळण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. ९) या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ते वायव्येकडे सरकण्याचे संकेत आहेत. यामुळे उत्तर ओडिशा, पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम व मेघालयात पावसाचा जोर वाढून, या भागातही माॅन्सून दाखल होईल. दरम्यान पश्‍चिम बंगाल, ओडिशाच्या किनाऱ्यालगत जोरदार वारे वाहून समुद्र खवळण्याची इशारा देण्यात आला आहे.  

कोकणात रविवारपर्यंत धुवाधार पाऊस 
माॅन्सूनच्या आगमनास अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने रविवारपर्यंत (ता. १०) मुंबईसह कोकणात, तर शनिवारपर्यंत (ता.९) कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह दक्षिण अंतर्गत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी, तर उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी धुवाधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण किनाऱ्यालगत ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. या वाऱ्यामुळे समुद्र खवळून उंच लाटा उसळणार असल्याने मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...