माॅन्सूनची वाटचाल आठवडाभर लांबणीवर...

माॅन्सूनची वाटचाल आठवडाभर लांबणीवर...
माॅन्सूनची वाटचाल आठवडाभर लांबणीवर...

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची (मॉन्सून) वाटचाल मजल-दरमजल करीत सुरू आहे. सोमवारी (ता. ११) मॉन्सूनने विदर्भ, मराठवाड्यात प्रगती करत बुलडाणा, अमरावती, गोंदियापर्यंत धाव घेतली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मात्र माॅन्सूनने आणखी प्रगती केलेली नाही, तर ईशान्य भारतात बुधवारपर्यंत आणखी प्रगती शक्य आहे. त्यानंतर मात्र माॅन्सूनचा प्रवाह कमकुवत होणार असल्याने आठवडाभर माॅन्सूनची वाटचाल होणार नसल्याचे हवामान विभागने स्पष्ट केले आहे. माॅन्सूनने शनिवारी (ता. ९) निम्मा महाराष्ट्र व्यापल्यानंतर रविवारी (ता.११) कोणतीही प्रगती केली नव्हती. त्यानंतर आज (सोमवारी) मॉन्सूनने विदर्भाच्या काही भागात प्रगती केली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील माॅन्सूनची सीमा मात्र कायम आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे माॅन्सूनने ईशान्य आणि पूर्व भारतातील राज्यांमध्ये हजेरी लावली. पश्‍चिम बंगाल, आसाम, मेघालयाच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले आहे. बुधवारपर्यंत (ता. १३) पूर्व भारतातील आणखी काही राज्यांमध्ये माॅन्सूनची प्रगती शक्य असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. ईशान्य भागातील मॉन्सूनची वाटचाल यंदा संथ गतीने सुरू आहे. साधारणपणे ५ जूनपर्यंत माॅन्सून ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये दाखल होत असतो. यंदा ११ जून उलटूनही मॉन्सूनने अपेक्षित पल्ला गाठला असून असाम, अरुणाचल प्रदेशच्या आणखी काही भागात मॉन्सून पोचलेला नाही, तर माॅन्सून १० जूनपर्यंत देशाच्या पूर्व भागातील बिहार राज्यापर्यंत पोचतो, मात्र या भागातील मॉन्सूनचे आगमनही लांबले असून, पश्‍चिम बंगालच्या दक्षिण भागापर्यंतच मॉन्सूनची वाटचाल झालेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com