agrowon news in marathi, monsoon reached at Andman, Maharashtra | Agrowon

माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 मे 2018

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील वाटचाल सुरू केली आहे. माॅन्सूनने शुक्रवारी दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटांपर्यंत धडक दिली आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने रविवारपर्यंत (ता. २७) अंदमान बेटांचा आणखी काही भाग आणि अरबी समुद्राच्या कोमारीन भागापर्यंत दाखल होण्याचे संकेत अाहेत, तर मंगळवारपर्यंत (ता. २९) मॉन्सून दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडूमध्ये धडक देणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या उपसागरातील वाटचाल सुरू केली आहे. माॅन्सूनने शुक्रवारी दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटांपर्यंत धडक दिली आहे. पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने रविवारपर्यंत (ता. २७) अंदमान बेटांचा आणखी काही भाग आणि अरबी समुद्राच्या कोमारीन भागापर्यंत दाखल होण्याचे संकेत अाहेत, तर मंगळवारपर्यंत (ता. २९) मॉन्सून दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडूमध्ये धडक देणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

विषुववृत्ताकडून येणारे जोरदार वाऱ्याचे प्रवाह, ढगांचे दाट अच्छादन आणि पाऊस या घटकांची स्थिती पाहता मॉन्सून अग्नेय बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर दाखल झाला असल्याचे स्पष्ट होत आहे.

रविवारपर्यंतच्या (ता. २७) ४८ तासांमध्ये दक्षिण अंदमान समुद्र, कोमारीन - मालदीव परिसराचा काही भाग, दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान, निकोबार बेटांच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर मंगळवारपर्यंत (ता. २९) दक्षिण केरळ, दक्षिण तमिळनाडू, लक्षद्वीप बेटे, अंदमान निकोबार बेटांच्या संपूर्ण भागात माॅन्सून पोचण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

मॉन्सून सर्वसाधारणपणे २० मे रोजी अंदमान बेटांवर दाखल होत असतो. मात्र, यंदा तो तीन दिवस उशिराने २३ मे राेजी अंदमानात तर नियमित वेळेच्या (१ जून) तीन दिवस आधी २९ मे रोजी केरळात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, अंदाजापेक्षाही दोन दिवस उशिराने म्हणजेच २५ मे रोजी मॉन्सून अंदमानात डेरेदाखल झाला आहे. तर २९ मे राेजी माॅन्सून केरळात पोचण्यास पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे. 

‘मेकुणू’ घालतेय धुमाकूळ
अरबी समुद्रात आलेले ‘मेकुणू’ चक्रीवादळ सध्या धुमाकूळ घालत आहेत. या वादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. सोकोट्रापासून उत्तरेकडे ३१० किलोमीटर, तर सलालाहपासून १८० किलोमीटर समुद्रात असलेले वादळ ताशी सात किलोमीटर वेगाने ओमानकडे झेपावत आहे. शनिवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत हे वादळ सलालाहच्या किनाऱ्याला धडकणार आहे. ताशी १६० ते १७० किलोमीटर वेगाने चक्राकार फिरत असलेल्या वादळामुळे सलालाहच्या किनाऱ्याजवळ १९० किलोमीटर वेगाने वाऱ्याचे झोत येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे संकेत
अंदमानात माॅन्सून दाखल झाला असतानाच, अंदमान समुद्र आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. सोमवारी (ता. २८) पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाब क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. मॉन्सून मंगळवारी (ता. २९) मे रोजी केरळात दाखल होण्याची अंदाज असून,  हे कमी दाबाचे क्षेत्र मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक ठरण्याची शक्यता आहे.

अंदमानातील हजेरी 

वर्ष  आगमन
२०११ २९ मे
२०१२   २३ मे
२०१३   १७ मे
२०१४    १८ मे 
२०१५ १६ मे
२०१६   १८ मे
२०१७ १४ मे

   
    
 
 
    
 
    

 

इतर अॅग्रो विशेष
नाशिक विभागातील नुकसानग्रस्तांना चाळीस...नाशिक : गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत...
पुणे जिल्ह्यातील दहा धरणे शंभर टक्के पुणे ः गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणाच्या...
राज्यात अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी...
शेतीपूरक व्यवसायाला विदर्भात चालना...नागपूर ः सरकारने २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न...
इथेनॉलनिर्मितीसाठीच्या कर्जासाठीचे निकष...नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर कारखान्यांना...
सूक्ष्म सिंचन अनुदानाचे ९० कोटी अखर्चितमुंबई ः २०१७-१८ या वर्षातील सूक्ष्म सिंचन...
सोयाबीन लागवडीत ९ टक्के वाढनवी दिल्ली: कृषी विभागाच्या ९ ऑगस्टपर्यंतच्या...
तेलकट डाग रोगाने डाळिंबाला घेरलेसांगली ः राज्यात डाळिंबाचे सुमारे दोन लाखांहून...
‘नाफेड’समोर कांदा खरेदीचा पेचनाशिक : कांद्याचा घसरता दर थांबविण्यासाठी, तसेच...
अभ्यासू, प्रयोगशील युवकाची एकात्मिक,...‘बीएस्सी ॲग्री’ची पदवी, त्यानंतर सुमारे १० वर्षे...
समविचारी पक्षांना सोबत घेणार ः चव्हाणनाशिक : विरोधक एकत्र येऊ नयेत म्हणून भाजप...
स्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून...एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी...
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...