agrowon news in marathi, monsoon reached at Karnataka, Maharashtra | Agrowon

माॅन्सून ६ ते ८ जून दरम्यान महाराष्ट्रात !
कोजेन्सिस वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे : अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांनी चाल दिल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) मॉन्सून बंगालच्या उपसागरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह महाराष्ट्रात माॅन्सून ६ ते ८ जून या कालावधीत पोचणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

पुणे : अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांनी चाल दिल्याने नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (माॅन्सून) अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १ जून) मॉन्सून बंगालच्या उपसागरासह ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह महाराष्ट्रात माॅन्सून ६ ते ८ जून या कालावधीत पोचणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

मॉन्सून यंदा तीन दिवस आगोदर मंगळवारी (ता.२९) केरळमध्ये दाखल झाला. अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे माॅन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण अंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली. दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार ५ जूनपर्यंत पोचणारा मॉन्सूनने यंदा ३० जून रोजी या भागात दाखल झाला आहे. कर्नाटकमधील शिरोली, हस्सन, मैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. 

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, देशाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. ३) प्रगती करण्याची शक्यता आहे. त्यानंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ६ जूननंतर महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस जोर धरणार असून, ६ ते ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात माॅन्सून पोचणे होणे शक्य असल्याचे सांगण्यात आले. 

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) रूपांतर झाले होते. मध्य रात्री ही प्रणाली ‘क्याकप्यू’जवळ म्यानमारच्या किनाऱ्याला धडकल्यानंतर तिची तीव्रता कमी झाली. ईशान्येकडे सरकरत असलेल्या या कमी दाब क्षेत्रामुळे शुक्रवारपर्यंत (ता. १) ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 

विदर्भात उष्णतेची लाट
राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण होत असून, तापमानातही चढ-उतार सुरू आहेत. राज्यात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून, शनिवारपासून (ता. २) पाऊस वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरी व वर्धा येथे ४७ तर नागपूर येथे ४६.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. अनेक ठिकाणी तापमान ३६ अंशांच्या खाली आले आहे. 

इतर अॅग्रो विशेष
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...