मॉन्सून दक्षिण श्रीलंका, अरबी समुद्रात दाखल

माॅन्सून
माॅन्सून

पुणे ः नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) आपला प्रवास सुरू ठेवत रविवारी श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली आहे. सोमवारी (ता. २८) अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.  मॉन्सूनने शुक्रवारी (ता. २५) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. रविवारी मॉन्सूनने अंदमान बेटांवरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा पार केला. दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरीन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. रविवारपर्यंत मालदीव-कोमोरीनचा संपूर्ण भाग, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत माॅन्सून पोचण्याची शक्यता आहे. तर बुधवारपर्यंत (ता. ३०) मॉन्सून केरळात दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.  केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र केरळ-कर्नाटकच्या किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात रविवारी (ता. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लगूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ‘मेकुणू’ वादळ निवळून गेले असून, सौदी अरेबिया आणि परिसरावर ठळक कमी दाब क्षेत्र सक्रिय होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com