मॉन्सूनने केरळ व्यापला; गुरुवारपर्यंत कर्नाटकात

मॉन्सूनने केरळ व्यापला; गुरुवारपर्यंत कर्नाटकात
मॉन्सूनने केरळ व्यापला; गुरुवारपर्यंत कर्नाटकात

पुणे : नैऋत्‍य मोसमी वारे (माॅन्सून) मंगळवारी (ता. २९) केरळमध्ये दाखल झाले आहेत. मॉन्सूनने केरळचा बहुतांशी भाग व्यापला असून, तमिळनाडूच्या दक्षिण भागात हजेरी लावल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने गुरुवारपर्यंत (ता. ३१) मॉन्सून कर्नाटकपर्यंत धडक देण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.  मॉन्सून सर्वसाधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होत असतो. मात्र यंदा तो तीन दिवस आधी केरळात धडकेल, असे हवामान विभागाने आधीच जाहीर केले होते. हा अंदाज अचूक ठरवत माॅन्सून मंगळवारी केरळमध्ये दाखल झाला. माॅन्सूनने अरबी समुद्र, केरळ, तमिळनाडूसह बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागात प्रगती केल्याचे जाहीर करण्यात आले. माॅन्सूनने केरळच्या कर्नुल, तमिळनाडूच्या कोईंबतूर, कोडाईकेनॉल, तुतीकोरीनपर्यंतचा भाग व्यापला आहे.  गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये केरळमध्ये पाऊस पडत असून, १४ केंद्रांवर ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. या भागात पश्‍चिमेकडून तीस नॉट्स वेगाने वारे वाहत असून, दक्षिण अरबी समुद्रावर साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिम किंवा नैर्ऋत्येकडून वारे वाहत असल्याचे दिसून आले आहे. या भागात ढगांची दाटी असून, वातावरणात जाणाऱ्या दीर्घ किरणोत्सारी लहरींच्या स्थितीचा विचार करून मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.  कर्नाटकात गुरुवारपर्यंत पोचणार? प्रगतीसाठी पोषक हवामान असल्याने गुरुवारपर्यंत (ता. ३१) मॉन्सून कर्नाटकमध्ये पोचण्याची शक्यता अाहे. केरळ आणि तमिळनाडूदरम्यान समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर वाऱ्याचे पूर्व पश्‍चिम जोडक्षेत्र आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रात आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात अशी दोन ठळक कमी दाबाची क्षेत्र सक्रिय आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंतच्या ४८ तासांमध्ये मॉन्सून मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.  गेल्या काही वर्षांतील मॉन्सूनचे केरळातील आगमन

वर्ष- आगमन
२०१३ १ जून
२०१४ ६ जून
२०१५ ५ जून
२०१६ ८ जून
२०१७ ३० मे
२०१८ २९ मे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com