agrowon news in Marathi, monsoon spread over state, Maharashtra | Agrowon

माॅन्सूनने जवळपास महाराष्ट्र व्यापला
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

पुणे : दाेन आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) वाटचालीला वेग आला आहे. रविवारी (ता.२४) सलग दुसऱ्या दिवशी आणखी वाटचाल करत माॅन्सूनने उत्तर विदर्भाचा काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. गुजरात राज्याच्या निम्म्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. अरबी समुद्रातून माॅन्सूनची वाटचाल झाली असली, तरी बंगालच्या उपसागराच्या शाखेची पूर्व भारतील वाटचाल ‘जैसे थे’ आहे. 

पुणे : दाेन आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) वाटचालीला वेग आला आहे. रविवारी (ता.२४) सलग दुसऱ्या दिवशी आणखी वाटचाल करत माॅन्सूनने उत्तर विदर्भाचा काही भाग वगळता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. गुजरात राज्याच्या निम्म्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. अरबी समुद्रातून माॅन्सूनची वाटचाल झाली असली, तरी बंगालच्या उपसागराच्या शाखेची पूर्व भारतील वाटचाल ‘जैसे थे’ आहे. 

माॅन्सूनने शनिवारी १४ दिवसांच्या मुक्कामानंतर उत्तरेकडील वाटचाल सुरू केली. कोकण किनारपट्टीचा संपूर्ण, तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग प्रगती करत माॅन्सून गुजरातमध्ये दाखल झाला होता. रविवारी माॅन्सूनने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा पूर्ण भाग व्यापला. विदर्भातील अमरावती आणि गोंदियापर्यंत माॅन्सूनने मजल मारली. तर, गुजरातमधील वेरावळ, अमरेली, अहमदबाद, मध्य प्रदेशातील खांडवापर्यंत मॉन्सून पोचला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
 
महाराष्ट्रात जवळपास दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (ता. २३) पुढे चाल केली आहे. मॉन्सूनने संपूर्ण कोकण किनारपट्टी व्यापून गुजरातच्या वलसाड, मध्य महाराष्ट्रातील मालेगाव, तर विदर्भातील अमरावतीपर्यंत मजल मारली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) महाराष्ट्रासह देशातील आणखी काही भागांत मॉन्सूनची वाटचाल शक्य आहे. यंदा देशात तीन दिवस आगोदर दाखल झालेल्या माॅन्सूनची उत्तरेकडील वाटचाल यंदा धीम्या गतीने सुरू आहे.

महाराष्ट्रात ८ जून रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने ९ जून रोजी जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला. त्यानंतर १४ दिवस मॉन्सूनने या भागातून पुढे चाल केली नव्हती. साधारणत: १२ जून रोजी संपूर्ण राज्यात दाखल होणारा मॉन्सून २४ जून उलटूनही संपूर्ण राज्य व्यापू शकलेला नाही; तर १५ जून रोजी गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारमध्ये पोचणाऱ्या मॉन्सूनसाठी यंदा हा टप्पा दूरच अाहे. बंगालच्या उपसागरावरूनही मॉन्सूनला अपेक्षित टप्पा गाठता आलेला नाही. 

पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने मंगळवारपर्यंत (ता. २६) संपूर्ण महाराष्ट्र, छत्तीसगडसह गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, बिहारच्या आणखी काही भागांत माॅन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे. तर, २९ जून ते १ जुलैपर्यंत मॉन्सून दिल्लीसह वायव्य भारताच्या काही भागांत दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मॉन्सूनची वाटचाल सुरू झाल्यानंतर पश्‍चिम आणि पूर्व किनाऱ्यावर समुद्र खवळणार असून, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...