agrowon news in marathi, monsoon will reach in andman on 23 and in kerla on 29 th may, Maharashtra | Agrowon

मॉन्सून २३ला अंदमानात; २९ मे रोजी केरळात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 मे 2018

पुणे : देशभरातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) २९ मे रोजी केरळात आगमन होणार आहे. त्यापूर्वी २३ मे रोजी माॅन्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. अंदमानात नियोजित वेळेच्या तीन दिवस उशिराने येणारा मॉन्सून केरळमध्ये तीन दिवस अगोदर येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सून केरळमध्ये साधारणत: १ जून रोजी दाखल होत असतो. मात्र मॉन्सूनचे आगमनात सात दिवस आगोदर किंवा उशिरा होण्याची शक्यता असते. 

पुणे : देशभरातील शेतकरी आतुरतेने वाट पाहत असलेल्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) २९ मे रोजी केरळात आगमन होणार आहे. त्यापूर्वी २३ मे रोजी माॅन्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. अंदमानात नियोजित वेळेच्या तीन दिवस उशिराने येणारा मॉन्सून केरळमध्ये तीन दिवस अगोदर येणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सून केरळमध्ये साधारणत: १ जून रोजी दाखल होत असतो. मात्र मॉन्सूनचे आगमनात सात दिवस आगोदर किंवा उशिरा होण्याची शक्यता असते. 

मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर देशातील पावसाच्या हंगामाला सुरवात झाली, असे मानले जाते. त्यानंतर मॉन्सून मजल दरमजल करत उत्तरेकडे प्रगती करतो. यंदा नियोजित वेळेच्या तीन दिवस आगोदर म्हणजे २९ मे रोजी मॉन्सून केरळात दाखल होणार आहे. 

भारतीय हवामान विभाग २००५ पासून मॉन्सून केरळात दाखल होण्याविषयी अंदाज व्यक्त करत आहे. या अंदाजात ४ दिवसांची तफावत गृहीत धरली जाते. २००५ ते २०१७ या १३ वर्षांच्या कालावधीत २०१५ हे वर्ष वगळता हवामान विभागाचा मॉन्सूनविषयीचा अंदाज अधिक अचूक आला आहे. २०१५ मध्ये माॅन्सून वारे ३० मे रोजी केरळात दाखल होतील असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात तो ५ जून रोजी केरळात डेरेदाखल झाला होता.   
मॉन्सून दाखल होण्यासाठी सहा मानके लक्षात घेतली जातात. यात दक्षिण द्वीपकल्पावर होणारा पूर्वमोसमी पाऊस, दक्षिण चीन सागरातून बाहेर पडणारे दीर्घ किरणोत्सर्ग, अाग्नेय हिंद महासागरावरील हवेच्या खालच्या स्तरातील वारे, विषुववृत्तीय पूर्व हिंद महासागरातील वरच्या स्तरातील वारे, नैर्ऋत्य प्रशांत महासागरातील बाहेर पडणारे दीर्घ किरणोत्सर्ग यांचा अभ्यास केला जातो.  

अंदमानात उशिराने आगमन
मॉन्सून साधारणत: १५ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात तर २० मे रोजी अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोचतो. दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झालेला नसल्याने यंदा अंदमान निकोबार बेट समूहावर उशिरा येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यानुसार यंदा अंदमानातील मॉन्सूनचे आगमन तीन दिवसांनी लांबणार अाहे. यंदा २३ मे राेजी अंदमानात पोचणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 

गेल्या पाच वर्षांतील मॉन्सूनचे केरळातील आगमन

वर्ष     अंदाज     प्रत्यक्ष आगमन
२०१३  ३ जून   १ जून
२०१४  ५ जून ६ जून
२०१५  ३० मे   ५ जून
२०१६   ७ जून  ८ जून
२०१७ ३० मे   ३० मे

     

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...