भुईमुगालाही हमीभाव मिळेना

मी तीन एकर भुईमूग लागवड केली होती. मला तीन एकरात १३ ते १४ क्विंटल भुईमूग झाला. सध्या भुईमुगाला तीन हजार ते ३५०० रुपये भाव मिळत अाहे. यामुळे लागवड खर्चसुद्दा निघण्याची शक्यता नाही. शासनाने भुईमूग किमान सात हजार रुपये भाव देण्याची गरज अाहे. - सुरेश कुऱ्हाडे, भुईमूग उत्पादक शेतकरी, दानापूर, जि. अकोला
अकोला ः दानापूर परिसरात भुईमूग काढणी सुरू असताना सुनीलकुमार धुरडे यांनी टिपलेले छायाचित्र.
अकोला ः दानापूर परिसरात भुईमूग काढणी सुरू असताना सुनीलकुमार धुरडे यांनी टिपलेले छायाचित्र.

अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी सुरू झाली असून, इतर पिकांप्रमाणे भुईमुगालासुद्धा हमीभावाइतकाही दर बाजारपेठेत मिळताना दिसत नाही.  शासनाने ४४५० रुपये हमीदर जाहीर केलेला असताना हजार रुपये कमी दराने भुईमूग विकला जात अाहे. सध्या ३२०० ते ३६०० दरम्यान विक्री होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  जिल्ह्यात तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी, पातूर तालुक्यात भुईमुगाची लागवड होत असते. या वर्षी पाण्याची पातळी कमी झाल्याने लागवड घटली होती. ज्यांनी लागवड केली त्यांचा भुईमूग काढणीचे काम सध्या सुरू झाले अाहे. भुईमुगाचे शेत खाली करून त्यात खरिपाची पिके लागवड करायची असल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली अाहे. मागील वर्षाप्रमाणेच हाही हंगाम भुईमूग उत्पादकांसाठी फारसा चांगला राहिलेला नाही. भुईमुगाचे उत्पादन एकरी १० ते १२ क्विंटलपर्यंत येत अाहे. शेंगा वाळल्यानंतर त्या अर्ध्याच राहतात. म्हणजे एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन होते. ही वाळलेली शेंग बाजारात विक्रीला नेली असता व्यापाऱ्यांकडून अवघा ३२०० ते ३६०० दरम्यान दर दिला जात अाहे. या कमी दरामुळे शेतकऱ्यांना भुईमुगाचे पीक परवडणारे राहिले नाही.  भुईमुगाची काढणी हंगाम वेगाने सुरू असून स्थानिक मजूर मिळत नसल्याने सातपुड्यात राहत असलेला अादिवासी मजूर या कामासाठी उपयोगी पडत अाहे. ३०० ते ३५० रुपये क्विंटल दराने हे मजूर भुईमुगाची काढली करीत अाहेत.  रखरखत्या उन्हात भुईमूग काढणीची कामे सर्वत्र सुरू झाली अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com