agrowon news in marathi, Mukane committee for restrict fraud in sugar industries, Maharashtra | Agrowon

साखर कारखान्यांमधील गैरव्यवहाराचा शोध घेण्यासाठी मुकणे समिती
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे बळकटीकरणाचे मुद्दे तसेच गैरव्यवहाराला पायबंद घालण्यासाठी उपाय शोधण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. सहकारमंत्र्यांनी आता मुकणे समितीची स्थापना केली असून, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे बळकटीकरणाचे मुद्दे तसेच गैरव्यवहाराला पायबंद घालण्यासाठी उपाय शोधण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. सहकारमंत्र्यांनी आता मुकणे समितीची स्थापना केली असून, दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे बळकटीकरण झाले पाहिजे. त्यात राजकारण न आणता दीर्घकालीन धोरण राबवावे लागेल, असे मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांचे मत असून त्यासाठीच कारखान्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झाला होता. आता ही जबाबदारी मुकणे समितीकडे देण्यात आली आहे, अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

सहकारी साखर कारखान्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून गुणात्मक सुधारणा सूचविण्यासाठी अभ्यास करण्याची जबाबदारी या समितीकडे देण्यात आली आहे. साखर संचालक (अर्थ) ज्ञानदेव मुकणे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत साखर संचालक (प्रशासन) शैलेश कोतमिरे, कोल्हापूरचे प्रादेशिक सहसंचालक सचिन रावळ, साखर सहसंचालक (प्रशासन) राजेश सुरवसे हे सदस्य म्हणून काम बघणार आहेत.

साखर कारखान्यांच्या एफआरपीवर लक्ष ठेवणारे सध्याचे साखर सहसंचालक (अर्थ) मंगेश तिटकारे यांच्याकडे या समितीचे सदस्य सचिवपद देण्यात आलेले आहे. अर्थ विभागाकडे राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांची कुंडली आहे. ‘‘मुकणे समितीला ११ बाबींवर काम करण्यास सांगण्यात आलेले आहे. त्यापैकी कारखान्यांच्या कामकाजात आलेल्या त्रुटी, अनियमितता आणि गैरव्यवहार शोधणे ही मुख्य बाब आहे. अर्थ विभागाचा या समितीत समावेश असल्यामुळे भक्कम उपाय सुचविले जावू शकतात,’’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.

विद्यमान साखर आयुक्त संभाजी कडूपाटील हे स्वतःच पारदर्शकतेचा आग्रह धरत असल्यामुळे या समितीकडून राज्य शासनाला साखर कारखाना चळवळीच्या हिताला उपयुक्त ठरणाऱ्या अनेक धोरणात्मक बाबी सुचविल्या जाण्याची शक्यता आहे.

मुकणे समिती नेमका कशाचा शोध घेणार?

  • साखर कारखान्यांमधील गैरव्यवहाराचे मार्ग कोणते व त्यावर उपाय कोणते
  • कारखान्यांच्या गुणात्मक कामकाजात वाढ कशी होईल
  • अवसायानात गेलेल्या कारखान्यांचे पुनरूज्जीवन कसे करता येईल
  • गैरव्यवहार करणाऱ्या कारखान्यांवर काय कारवाई झाली आणि त्याचे परिणाम काय झाले
  • कारखान्यांमुळे किती रोजगारनिर्मिती होते व त्यात किती भर पडली
  • शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीमध्ये कारखान्यांचा वाटा किती
  • समस्या असतानाही चांगले काम करणारे कारखाने कोणते
  • कारखान्यांसमोरी प्रमुख अडचणी कोणत्या व त्यावर उपाय काय असावेत
  • राज्यात ज्या हेतूने कारखाने काढले गेले तो हेतू कितपत सफल झाला

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...