शेतकरी आणि ग्राहकांची सुयोग्य सांगड घालण्याची गरज ः उपराष्ट्रपती नायडू

शेतकरी आणि ग्राहकांची सुयोग्य सांगड घालण्याची गरज ः उपराष्ट्रपती नायडू
शेतकरी आणि ग्राहकांची सुयोग्य सांगड घालण्याची गरज ः उपराष्ट्रपती नायडू

पुणे ः अनियमित माॅन्सून, बाजारभावाची अनिश्चितता, नैसर्गिक आपत्ती यांचा कृषी क्षेत्रावर थेट परिणाम होत असून, या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्यासाठी कृषिमाल उत्पादक शेतकरी आणि ग्राहक यांची सुयोग्य सांगड घालण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी केले.   वैकुंठ मेहता सहकार व्यवस्थापन राष्ट्रीय संस्थेमध्ये आयोजित ‘कृषी क्षेत्र शाश्वत व फायदेशीर’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप शुक्रवारी (ता. २२) झाला. या वेळी नायडू यांनी मार्गदर्शन केले. पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला, आय. व्ही. सुब्बा राव, टी. चटर्जी, प्रो. अशोक गुलाटी या वेळी उपस्थित होते. उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, की शेती व्यवहार्य, सैनिक, वैज्ञानिक आणि शेतकरी यांच्यामुळेच आपल्या देशाला जगभरात सन्मान मिळत आहे. त्यामुळे आपण जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या त्रिसुत्रीला कायम स्मरणात ठेवायला हवे. शेतकरी हा सर्वांचा अन्नदाता असून त्याचा सन्मान होण्याची आवश्यकता आहे. अन्न सुरक्षा हीच राष्ट्र सुरक्षेची चावी असून कृषी क्षेत्राला शाश्वत आणि किफायतशीर बनविण्याचे कायमस्वरूपी धोरण स्वीकारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला म्हणाले, की कृषी क्षेत्राच्या विकासावर अनेक घटकांचा परिणाम होतो, त्यात अनियमित माॅन्सूनचा मोठा वाटा आहे. विविध उपययोजनांमुळे देशातील शेती उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. शेतकऱ्याच्या उत्पादित कृषी मालाला योग्य बाजारपेठ मिळवून देणे आवश्यक आहे. केंद्र सरकार त्यासाठी प्रयत्नशील असून सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट दर मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपराष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू असणारी ‘स्वराज्य ते सुराज्य’ ही चर्चासत्राची शृंखला अत्यंत महत्त्वाची आहे.’’ आंध्रप्रदेशचे माजी मंत्री व्ही. एस. राव यांनी त्यांच्या गटातील केंद्र सरकारचे कृषी सचिव एस. के. पट्टनायक, प्रो. अशोक गुलाटी यांच्या साथीने ‘सक्षम धोरण मांडणी तयार करणे’ या विषयावर सादरीकरण केले. भारत सरकारचे कृषी आयुक्त एस. के. मल्होत्रा यांनी त्यांच्या गटातील अराबीन दास, डॉ. के. एच. पुजारी यांच्या साथीने ‘शेतीची गहनता, उच्च मूल्य शेतीसाठी वैविध्य आणि संबद्ध कृतीवद्वारा उत्पन्नाची पूरकता’ या विषयावर सादरीकण केले. अशोक दलवाई यांनी ‘विपणन आणि कृषी वाहतूक’ या विषयावर सादरीकरण केले. निती आयोगाचे सल्लागार जे. पी. मिश्रा यांनी त्यांच्या गटातील संजीव कुमार चढ्ढा, राजेश सिन्हा यांच्या साथीने ‘कृषी व्यापार धोरण’ या विषयावर सादरीकरण केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू के. पी. विश्वनाथ यांनी त्यांच्या गटातील डॉ. अशोक पातुरकर, डॉ. लखन सिंह यांच्या साथीने ‘प्रयोग शाळेतील तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचविणे’ या विषयावर सादरीकरण केले. भारत सरकाच्या कृषी विभागाचे सह-आयुक्त दिनेश कुमार यांनी ‘कृषी पत आणि विमा’ या विषयावर सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com