agrowon news in marathi, Need of reduce use of water, Maharashtra | Agrowon

शेतीचा पाणीवापर कमी करण्याची गरज : नीती आयोग
वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नवी दिल्ली : देशात पाण्याचा अतिवापर सुरू असून, २०३० पर्यंत दुप्पट पाण्याची मागणी असेल आणि पुरवठा मात्र घटलेला असेल. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. शेतीसाठी होणारा पाणीवापर ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य असून, ते करणे आवश्यक आहे. तसेच, उपलब्ध असलेल्या पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे नीती आयोगाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : देशात पाण्याचा अतिवापर सुरू असून, २०३० पर्यंत दुप्पट पाण्याची मागणी असेल आणि पुरवठा मात्र घटलेला असेल. त्यामुळे भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागेल. शेतीसाठी होणारा पाणीवापर ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य असून, ते करणे आवश्यक आहे. तसेच, उपलब्ध असलेल्या पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे नीती आयोगाने नुकतेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

नीती आयोगाने नुकतेच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटले आहे, की भारत इतिहासात सर्वांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. जवळपास ६० कोटी लोकांना जास्त ते अतिजास्त पाणीटंचाई सहन करावी लागत आहे. तसेच देशात प्रत्येक वर्षी जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू शुद्ध पाण्याच्या कमतरतेमुळे होतो.

२०३० पर्यंत देशात पाण्याच्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणी दुपटीने वाढेल आणि अत्यंत पाणीटंचाई निर्माण होईल. जवळपास १० कोटी लोकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. तसेच, देशाच्या विकास दरात सहा टक्क्यांनी घट होईल. भारतातील तब्बल ७० टक्के पाणी दूषित असून, पाणी गुणवत्ता इंडेक्समध्ये भारत १२२ देशांच्या यादीत १२० व्या क्रमांकावर आहे. 

इंडियन स्पेस रिसर्च सेंटरचे माजी अध्यक्ष के. कस्तुरंजन म्हणाले, की जगातील अनेक देशांतील पाणीवापर हा ४० ते ४५ टक्क्यांपर्यंत आहे. भारतात मात्र हे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे. भविष्यातील समस्या कमी करण्यासाठी भारतातील शेतीसाठीचा वापर हा ५० टक्क्यांच्या आत आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सिंचनासाठीच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे.

तसेच, देशातील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन आवश्यक आहे. देशात भूमिगत पाण्याचे अतिप्रमाणात शोषण होत आहे. अमेरिकेच्या उपग्रहाने उत्तर भारतात भूमिगत पाण्याचा अतिउपसा झाला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंजाबसारख्या प्रगतिशील राज्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे.  

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...