agrowon news in marathi, not relaxation for krushi parvekshak, Maharashtra | Agrowon

‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा दिलासा नाहीच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 मे 2018

अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नत झालेल्यांचे डिमोशन करण्याची प्रक्रिया राबवली जात अाहे. याला अाक्षेप घेत काही जणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती. मात्र या न्यायाधिकरणाने ही याचिका निकाली काढल्याने कुठलाही दिलासा मिळू शकलेला नसल्याचे वृत्त अाहे. 

अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन २०११ मध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर पदोन्नत झालेल्यांचे डिमोशन करण्याची प्रक्रिया राबवली जात अाहे. याला अाक्षेप घेत काही जणांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती. मात्र या न्यायाधिकरणाने ही याचिका निकाली काढल्याने कुठलाही दिलासा मिळू शकलेला नसल्याचे वृत्त अाहे. 

मॅटमध्ये गेल्याने मंगळवारी (ता. २२) नियोजित असलेली प्रक्रिया थांबवण्यात अाली होती. अाता ही प्रक्रिया पुन्हा जून महिन्यात सुरू होणार असल्याचे कळते. अमरावती विभागात सन २०११ मध्ये नियमित व तदर्थ पदोन्नती देताना अनेक अपात्र उमेदवारांना अंतरिम ज्येष्ठता यादीनुसार पदोन्नती दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या प्रकरणी नियमित पदोन्नती मिळालेल्या उमेदवारांपैकी अंतिम ज्येष्ठता सूचीप्रमाणे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे डिमोशन केले जाणार होते. यासाठी विभागीय सहसंचालकांनी या कृषी पर्यवेक्षकांना नोटीस देत २२ मे रोजी अमरावती येथे उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.

मात्र याविरुद्ध काहींनी तत्काळ मॅटमध्ये धाव घेत ही प्रक्रिया थांबवली होती. दरम्यान कृषी पर्यवेक्षकांनी दाखल केलेली याचिका न्यायाधिकरणाने निकाली काढली. त्याठिकाणी गेलेल्यांना फारसा दिलासा मिळालेला नाही. 

अाता पुन्हा ही थांबलेली प्रक्रिया राबवून संबंधितांचे डिमोशन करीत त्यांना हवे असलेले ठिकाण दिले जाणार अाहे. सन २०११ मध्ये चुकीच्या पद्धतीने झालेल्या या पदोन्नतींमुळे व बिंदू नामावली तयार नसल्याने विभागात कृषी खात्यात अनेकांच्या पदाेन्नत्या रखडलेल्या अाहेत. राज्याच्या विविध भागांत एकीकडे सर्व प्रक्रिया झालेल्या असताना अमरावती विभाग यादृष्टीने पिछाडीवर पडलेला अाहे. अपात्र असलेल्यांचे डिमोशन करीत पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जाणार अाहे.

एकदा हा विषय मिटल्यानंतर इतर कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीचा मार्ग खुला होणार अाहे. परंतु ही डिमोशन प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने अडचणी तयार झालेल्या होत्या. मॅटने याचिका निकाली काढल्याने अाता अमरावती विभागात जून महिन्यात डिमोशन, पदोन्नतीची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली अाहे. जर संबंधित कर्मचारी प्रक्रियेविरुद्ध उच्च न्यायालयात गेले तर अाणखी प्रक्रिया रखडण्याचीसुद्धा चर्चा सुरू झाली अाहे.

इतरांचे २९ ला ‘समुपदेशन’
कृषी पर्यवेक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांची मंगळवारी (ता. २९) समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबवली जाणार अाहे. अमरावती विभागात अशा प्रकारच्या बदलीबाबतचे धोरण अमलात अाणण्यासाठी कृषी पर्यवेक्षकांना या दिवशी बोलविण्यात अाले अाहे. या प्रक्रियेसाठी पदावनतीच्या कक्षेत असलेल्या कृषी पर्यवेक्षकांना वगळण्यात अाले अाहे. पदावनतीच्या प्रक्रियेविरुद्ध काही पर्यवेक्षक नागपूर उच्च न्यायालयात गेलेले अाहेत. तर काही जण मॅटमध्ये गेले असता त्यांच्या प्रकरणाचा न्याय निर्णय झाला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने जे कृषी पर्यवेक्षक पदावनतीच्या कक्षेत अाहेत त्यांनी मंगळवारी होत असलेल्या नियतकालीक बदली सुमपदेशनाकरिता हजर राहण्याची अावश्यकता नाही, असे तातडीने विभागीय कृषी सहसंचालकांनी विभागातील कृषी यंत्रणांना कळविले अाहे.

इतर अॅग्रो विशेष
गोंधळलेला शेतकरी अन् विस्कळित नियोजनशेती क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व हे नियोजनाला आहे...
निराशेचे ढग होताहेत अधिक गडद७  ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस   ...
राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागूमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
‘एसएमएस’ अटीमुळे हजारो शेतकरी...लातूर : शासनाने राज्यातील चार लाखापेक्षा जास्त...
शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून...नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री...नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२...
कांदाप्रश्‍नी ‘करेक्शन’ करण्याच्या...नाशिक : लोकसभेच्या आगामी निवडणुकांकडे लक्ष...
राज्यातील १४५ बाजार ‘ई-नाम’शी जोडणारमुंबई (प्रतिनिधी) : शेतमालाला रास्त भाव मिळवून...
काय आणि कसं पेरावं ?लाखनवाडा, जि. बुलडाणा ः लाखनवाडा येथे एेन खरीप...
जलसंधारण, बहुवीध पीक पद्धतीतून धामणी...अनेक वर्षांपासून दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या...
भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप...भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान...
का झाले बीटीचे वाटोळे?राज्यात सुमारे १५० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो...
अनधिकृत कापूस बियाणे आणि हतबल सरकारमहाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने ...
नवे संशोधन, नवे वाण ही काळाची गरज...आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारास झालेला विलंब...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...