agrowon news in marathi, obstacles in crop loan distribution due to forms and NPA accounts , Maharashtra | Agrowon

उतारे, एनपीए खात्यांमुळे कर्जवाटपात अडथळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 27 जून 2018

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करताना महसूल खात्याचे उतारे उशिरा मिळत असून, एनपीएमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटपात अडथळे येत आहेत, अशी माहिती बॅंकिंग सूत्रांनी दिली. 

खरीप हंगामासाठी राज्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका संथपणे कर्जवाटप करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या बॅंका कोणालाही जुमानत नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात सेंट्रल बॅंकेच्या अधिकाऱ्याने पीककर्जाच्या मोबदल्यात महिला शेतकऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. 

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करताना महसूल खात्याचे उतारे उशिरा मिळत असून, एनपीएमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना कर्जवाटपात अडथळे येत आहेत, अशी माहिती बॅंकिंग सूत्रांनी दिली. 

खरीप हंगामासाठी राज्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका संथपणे कर्जवाटप करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे या बॅंका कोणालाही जुमानत नाहीत. बुलडाणा जिल्ह्यात सेंट्रल बॅंकेच्या अधिकाऱ्याने पीककर्जाच्या मोबदल्यात महिला शेतकऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. 

पीककर्जाचे वाटप, आढावा तसेच त्यातील नियोजनावर स्वतः मुख्यमंत्र्यांचे लक्ष असते. त्यासाठी राज्यस्तरीय बॅंकर्स समिती तयार करण्यात आली असून, ही समिती नेमके काय करते, असा सवाल सहकार विभागातील काही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. पीककर्ज वाटपातील समस्या आणि शेतकऱ्यांच्या निश्चित मागण्या याचा आढावा घेऊन या समितीने शासन व सहकार विभागाला वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, हे काम आमचे नाही, असे सांगत राज्यस्तरीय बॅंकर्स समिती बघ्याची भूमिका घेत असल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. 

‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना वेगाने कर्जवाटप करण्यासाठी बॅंकांना सूचना देण्याची मागणी केली आहे. यामुळे राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या माध्यमातून होणारी चर्चा आणि नियोजनाला काहीच अर्थ नसल्याचे दिसून येते. मुख्यमंत्र्यांनाच जर केंद्राकडे पत्र लिहिण्याची वेळ येत असल्यास राष्ट्रीयीकृत बॅंका गाव पातळीवर शेतकऱ्यांना किंमत देण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे शेतकरी विरुद्ध बॅंकांचे व्यवस्थापक असे वाद स्थानिक पातळीवर होत आहेत,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

बॅंकांच्या म्हणण्यानुसार, कर्जपात्र शेतकऱ्याला कर्ज देण्यास आमचा कोणताही विरोध नाही. मात्र, पुनर्गठनाच्या धोरणामुळे एकाच शेतकऱ्याची चार-चार बॅंक खाती तयार झालेली असून, त्यातील काही दोन खाती कर्जमाफीमुळे निल झाली आहेत. मात्र, दोन दोन खाती अजूनही एनपीएमध्ये आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार एनपीए खातेदाराला नवे कर्ज देता येत नाही. ही समस्या आम्ही राज्यस्तरीय बॅंकर्स समिती तसेच राज्य शासनालादेखील सांगितली होती. तथापि, यावर आम्हाला काहीही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. 

 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...