दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
ताज्या घडामोडी
वाशीम : पीककर्ज वाटपामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी तसेच पीककर्ज वाटपाला गती देण्यासाठी वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्याला आवश्यक पीककर्जासाठी ऑनलान नोंदणी करण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाइन स्वरूपात पीककर्ज मागणी नोंदविल्यानंतर शेतकऱ्यांना टोकन क्रमांक व त्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे, याविषयी माहिती मोबाईलवर दिली जाणार आहे. पीककर्ज वाटपाला गती देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.

श्री. मिश्रा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या www.collectorwashim.in या संकेतस्थळावर जिल्ह्यातील कोणताही शेतकरी मोबाईल अथवा संगणकाद्वारे कोणत्याही ठिकाणाहून पीककर्जाची मागणी ऑनलाइन स्वरूपात नोंदवू शकणार आहे. या वेळी शेतकऱ्यांना स्वतःचे नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, जमिनीचा तपशील, तसेच आवश्यक कर्ज आदी माहिती भरावी लागेल. कोणत्या बँकेकडून तसेच कोणत्या शाखेतून व किती पीककर्ज आवश्यक आहे, याची माहितीसुद्धा भरावी लागेल. अर्ज भरल्यानंतर शेतकऱ्याला या कर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती दिली जाईल. तसेच बँकेलाही संबंधित शेतकऱ्याची कर्ज मागणी ऑनलाइन कळविली जाईल. आवश्यक कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांना संबंधित बँकेत जावे लागेल.
ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेत जाऊन बँकेचा विहित नमुन्यातील अर्ज व कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यानंतर त्या अर्जावर बँकेने कोणती कार्यवाही केली, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा केला जाणार आहे. बँकेने कर्ज नाकारल्यास, त्याविषयीचे कारण नमूद करणे बँकेला बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे एखाद्या बँकेकडे प्राप्त झालेले अर्ज व त्यापैकी किती जणांना पीककर्ज वाटप झाले, किती जणांना कर्ज नाकारले, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सनियंत्रण केले जाणार आहे.
पीककर्ज वाटपाच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारींचे स्वरूप पाहून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला स्केल ऑफ फायनान्सनुसार पीककर्ज मिळावे, त्याच्याकडे बँकेने कोणत्याही अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये, यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हे संकेतस्थळ आहे. त्यामुळे पीककर्जासाठी इच्छुक जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संकेतस्थळावर पीककर्जासाठी नोंदणी करावी, असे आवाहन मिश्रा यांनी या वेळी केले आहे.
- 1 of 351
- ››