agrowon news in marathi, order online recruitment of co-operative banks, Maharashtra | Agrowon

सहकारी बॅंकांची नोकरभरती ऑनलाइन करण्याचे आदेश
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 जून 2018

मुंबई ः राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरती यापुढे ऑनलाइन करण्याचे आदेश सहकार विभागाने शासन निर्णयाद्वारे दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी बॅंकांमध्ये होणाऱ्या नोकरभरतीतील गैरप्रकार थांबण्याची अपेक्षा सहकार विभागाने व्यक्त केली आहे.

मुंबई ः राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमधील नोकरभरती यापुढे ऑनलाइन करण्याचे आदेश सहकार विभागाने शासन निर्णयाद्वारे दिले आहेत. त्यामुळे राज्यातील सहकारी बॅंकांमध्ये होणाऱ्या नोकरभरतीतील गैरप्रकार थांबण्याची अपेक्षा सहकार विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यातील राज्य सहकारी बॅंक या शिखर बॅंकेसह प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांमध्ये होणारी भरती ऑफलाइन पद्धतीने होत होती. भरतीत गैरव्यवहाराच्या तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले, तसेच ही भरतीप्रक्रिया प्रामाणिक व निष्पक्षपातीपणे, तसेच पारदर्शकरीत्या होत नसल्याचे प्राथमिक चौकशीअंती आढळून आल्याने जनतेच्या ठेवींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता राज्यातील सहकारी बॅंकांमध्ये होणारी नोकरभरतीची प्रक्रिया ऑनलाइन करावी, तसेच ही सर्व प्रक्रिया त्रयस्थ संस्थेमार्फत राबवावी, असा आदेश सहकार विभागाने शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध केला आहे.

नाबार्डच्या फेरमूल्यांकन समितीने नाबार्डकडे या संदर्भात पाठवलेल्या अहवालात बॅकिंग क्षेत्रातील बदल, तांत्रिकदृष्ट्या कुशल अधिकाऱ्यांची आवश्यकता, तसेच सद्यःस्थितीच्या स्पर्धात्मक बॅकिंग व्यवसायात बॅकिंगचा आत्मा असलेला गुणवत्तापूर्ण सेवकवर्ग बँकांमध्ये भरती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यासाठी सर्व जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये कामकाज कार्यक्षम आणि अविवादित पद्धतीने हाताळण्यासाठी ऑफलाइनऐवजी ऑनलाइन भरतीप्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व बॅंकांना सूचना देण्यात येत असून, त्यांनी यापुढे भरतीप्रक्रिया राबवण्यासाठी मान्यताप्राप्त ऑनलाइन भरतीप्रक्रिया राबवणाऱ्या क्षमता अनुभव आणि विश्वासार्हता असणाऱ्या संस्थेची नियुक्ती करावी.

या संस्थेला किमान पाच राष्ट्रीयीकृत बॅंका अथवा संस्थांमधील भरतीप्रक्रियेचा अनुभव असावा. या संस्था काळ्या यादीतील अथवा कोणतेही आरोप अथवा गुन्हे दाखल झालेल्या नसाव्यात. जिल्ह्याच्या ठिकाणी एकाचवेळी परीक्षा घेणे शक्य नसल्यास विविध टप्प्यांत परीक्षा घेताना परीक्षेची काठीण्य पातळी समान ठेवण्याची क्षमता असलेली संस्था असावी. ही संस्था निवड करण्याची जबाबदारी बॅंकेच्या संचालकांची राहील. तसेच, या संस्थेने कोणताही गैरप्रकार करू नये, तसेच काही आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याची जबाबदारीही बँकेचीच राहील असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. 

बँकेने नमूद केल्याप्रमाणे जाहिरात देण्यापासून ते अंतिम निवड यादीपर्यंत भरतीची सर्व प्रक्रिया  ऑनलाइनच करण्यात यावी. लेखी आणि मौखिक परीक्षेचे गुणांचे प्रमाण हे ९०:१० असे असावे. संस्थेने परीक्षा पार पडल्यावर उत्तरतालिका लगेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. परीक्षेसंदर्भातील सर्व कादगपत्रे संस्थेने सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपीच्या माध्यमातून किमान दोन वर्षे जतन करावीत.

सहकारी बॅंकांच्या यापुढील सर्व भरतीप्रक्रियेसाठी ही पद्धती राबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, जी सहकारी बॅंक या निर्देशांचे पालन करणार नाही त्यांच्यावर निबंधक, किंवा विभागीय सहनिबंधक यांनी उचित कारवाई करावी, असा इशाराही सहकार विभागाने या शासन निर्णयाद्वारे दिला आहे.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...