agrowon news in marathi, orders of cut payment of agri officers, Maharashtra | Agrowon

‘त्या’ कृषी अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश
मनोज कापडे
गुरुवार, 28 जून 2018

पुणे : कृषी खात्यामधील समुपदेशन बदल्यांच्या पारदर्शक धोरणाला होणारा विरोध मोडून कृषी आयुक्तांनी ६०० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, यातील १७५ अधिकारी खुर्च्या सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे खुर्च्यांना वेटोळे घालून बसलेल्या या निगरगट्ट अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

पुणे : कृषी खात्यामधील समुपदेशन बदल्यांच्या पारदर्शक धोरणाला होणारा विरोध मोडून कृषी आयुक्तांनी ६०० अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मात्र, यातील १७५ अधिकारी खुर्च्या सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे खुर्च्यांना वेटोळे घालून बसलेल्या या निगरगट्ट अधिकाऱ्यांचे पगार कापण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

‘‘मन मानेल तसे काम करण्यात तसेच कोणत्याही चौकश्यांमध्ये खोडा घालण्यास कृषी खात्यातील काही अधिकारी पटाईत आहेत. त्याचा प्रत्यय समुपदेशन बदल्यांच्या निमित्ताने शासनाला येतो आहे. बदल्या झाल्यानंतरदेखील अधिकारी आपल्या खुर्च्या सोडत नसल्यामुळे कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव बिजय कुमार व कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह अवाक् झाले आहेत. त्यामुळे कायदा पाळणार नसल्यास निलंबनाला तयार राहण्याचा इशारा आयुक्तांनी दिला असून, वेतनदेखील न देण्याची भूमिका घेतली आहे,’’ अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

समुपदेशन बदल्यांमध्ये आयुक्तांनी मोक्याची व मलईदार पदे ब्लॉक केली होती. या पदांवर कोणाचीही नियुक्ती होणार नव्हती. मात्र, आयुक्तांनी यादी मंत्रालयात पाठविल्यानंतर सोनेरी टोळीने ‘‘नजराणा तंत्र’’ वापरून काही ‘ब्लॉक’ केलेली पदे ‘ओपन’ करून बदल्या केल्या. तथापि, अशी पदे कमी असल्यामुळे यंदा बदल्यांमधील घोडेबाजाराला चाप बसला आहे.

बदल्या झाल्यानंतरदेखील शेकडो अधिकारी आपल्या पदाला चिकटून राहिल्याने -ऐन खरिपात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले गेले आहे. कृषी खात्यातील मनमानीचा हा प्रकार थेट मुख्यमंत्र्यांच्याही कानावर गेला आहे. कृषी आयुक्तांनी राज्यातील सर्व कृषी सहसंचालकांना स्वतः पत्र लिहून बदल्या झालेल्या कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. आयुक्तांनी ६०० बदल्या केल्या असून किमान १७५ अधिकाऱ्यांनी खुर्च्या सोडलेल्या नाहीत.

‘‘निलंबन व पगार कापण्याची कठोर भूमिका कृषी आयुक्तांनी घेतल्यामुळे काही अधिकाऱ्यांनी खुर्च्यांभोवती टाकलेले वेटोळे सैल करून बदली झालेल्या ठिकाणी जाण्याची तयारी सुरू केली आहे. काही अधिकारी नाईलाजास्तव रूजू होत असून मलईदार खुर्च्या गमावल्याची नाराजीदेखील दिसते आहे. बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांची खरोखर गैरसोय झाली आहे. तथापि, आयुक्तांना विरोध न करता असे अधिकारी तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू झाले आहेत’’, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

२१ जून २०१८ रोजी अपर मुख्य सचिव बिजय कुमार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या व्हिडिओ कॉन्फ्रसिंगमध्ये बदली करूनही खुर्च्या न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. मराठवाडा व विदर्भात ऐन खरिपात कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्त कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ मुक्त करून बदलीच्या ठिकाणी सोडले पाहिजे’’, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.

‘‘बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांचे पगार बदलीच्या ठिकाणाहूनच काढावेत असे आदेश आयुक्तांनी यानंतर दिले. बदलीच्या ठिकाणी जाण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबनाचे प्रस्ताव तयार करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत’’, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

...तर शिस्तभंग कारवाई
बदली होऊनदेखील अद्याप कार्यमुक्त न केलेल्या अधिकाऱ्यांना बदली झाल्याचे आदेश निघाल्याच्या तारखेपासून मानीव कार्यमुक्त करावे. कार्यमुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे वेतन संबंधित (जुन्या) कार्यालयाने करू नये. असे वेतन काढल्यास संबंधित नियंत्रण अधिकाऱ्याच्या वेतनातून या रकमेची वसुली करावी. कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त न करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आदेश कृषी अायुक्तांनी दिले आहेत.

 

इतर अॅग्रो विशेष
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...
जांभरुण परांडे गावात जन्माला आली...अमरावती : जांभरुण परांडे (जि. वाशीम) येथे...
शेतकऱ्यांना व्यापार संधी उपलब्ध होणारपुणे : राज्यात फळे भाजीपाल्याचे वाढते...