पावसामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी शिवारात शनिवारी (ता.१४) रात्री सात ते ९ यावेळेत जोरदार पाऊस झाल्याने शेकडो एकर शेती खरडून गेली. तर अजूनही काही शेतातील पिके पाण्याखाली आहेत.
मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी शिवारात शनिवारी (ता.१४) रात्री सात ते ९ यावेळेत जोरदार पाऊस झाल्याने शेकडो एकर शेती खरडून गेली. तर अजूनही काही शेतातील पिके पाण्याखाली आहेत.

पुणे: राज्याच्या काही भागात संततधार सुरू असल्यामुळे १७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. ९ जुलैपर्यंत राज्यात ६० टक्के पेरण्या झालेल्या होत्या.  विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि कोकणात जोरदार पाऊस होत आहे. नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे नुकसान होत असून, नुकसानीची निश्चित माहिती हाती आलेली नाही. ‘मराठवाडा वगळता राज्याच्या बहुतेक भागात चांगला पाऊस झालेला आहे. यामुळे किमान १५ ते १७ हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाल्याचा अंदाज आहे. कृषी विभागाकडून माहिती गोळा करणे सुरू असून, कापूस किंवा सोयाबीन यासारख्या प्रमुख पिकांना पावसाचा फटका बसल्याची माहिती कोठूनही आलेली नाही,’ असे सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यात ९ जुलैअखेर १९९ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांवर पाऊस झालेला आहे. १४० लाख हेक्टरपैकी ८४ लाख हेक्टरच्या पुढे पेरा झालेला असून, चांगल्या पावसामुळे पुढील दोन आठवड्यांत सर्वत्र पेरा झालेला असेल, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यंदा जूनच्या पंधरवड्यात पावसाचा खंड पडल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. आतापर्यंत कपाशीचा पेरा ३० लाख हेक्टरवर झाला असून, गेल्या हंगामात पेरा ३१ लाखांच्यावर गेला होता. सोयाबीनचा पेरा २८ लाख हेक्टरच्या पुढे झाला असून, गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा २५ लाख हेक्टरच्या आसपास होता. अकोला जिल्ह्यात २१०० हेक्टरवर नुकसान अकाेला जिल्ह्यात या अाठवड्यात ९ ते १२ जुलै या काळात झालेल्या जोरदार पावसाचा फटका शेतीसह घरांनाही बसला. पावसाच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यांत सुमारे २१०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान तर ६९४ घरांची पडझड झाली. तालुका यंत्रणांनी दोन हजार ९४ हेक्टर ८० अार क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अहवाल दिला असून, तो विभागीय अायुक्तांमार्फत शासनाकडे पाठवण्यात अाला अाहे. जिल्ह्यात ९ ते १२ जुलै या काळात संततधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला. याचा सर्वाधिक फटका बाळापूर तालुक्यात बसला असून, या तालुक्यातील १४५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यानंतर मूर्तिजापूरमध्ये ३५० हेक्टर व तेल्हारा तालुक्यात २९४ हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज यंत्रणांनी व्यक्त केला अाहे. एकूण दोन हजार ९४ हेक्टर ८० अार जमिनीवरील पिकांचे नुकसान दाखवण्यात अाले अाहे. संततधार पावसामुळे मातीच्या घरांचेही अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यात या चार दिवसांत ६९४ घरांची पडझड झाली अाहे. यामुळे सुमारे अडीच हजारांपेक्षा अधिक जण बाधित झाले. तर पुरामुळे मूर्तिजापूर तालुक्यात ४० हेक्टर जमीन खरडून गेली अाहे. ९ ते १२ जुलै असा चार दिवस सलग व जोरदार पाऊस झाला. या पावसाने पिकांना तसेच पेरणीचा मोठा दिलासा मिळाला. अाता दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पावसाने उघड घेतली अाहे. यामुळे पुन्हा एकदा शेतीतील कामांची लगबग वाढणार अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com