agrowon news in marathi, panloat froud, four dismissed, Maharashtra | Agrowon

पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्य
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 मे 2018

पुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी खात्यातील तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एका उपसंचालकाचीदेखील विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात माफीच्या साक्षीदाराने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. 

पुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी खात्यातील तालुका कृषी अधिकाऱ्याला निलंबित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एका उपसंचालकाचीदेखील विभागीय चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला या प्रकरणात माफीच्या साक्षीदाराने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. 

पाणलोट घोटाळ्यातील चार जणांच्या निलंबनाची शिफारस करणारा अहवाल काही महिन्यांपूर्वीच कृषी आयुक्तालयाकडे सादर झालेला होता. तथापि यावर कोणताही निर्णय न होता पाणलोट घोटाळा दडपण्यात आला. यात एका सहसंचालकाने अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यमान आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे निलंबन अटळ असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

सातारा जिल्ह्यात पाणलोटाची कामे करताना शेतकऱ्यांकडून २३ लाख रुपयांचा लोकवाटा जमा करण्यात आलेला आहे. नियमानुसार लोकवाट्याची रक्कम बॅंक खात्यात जमा करावी लागते. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी १७ लाख ८४ हजार रुपयांचा निधी मध्येच हडप केला आहे. 

“विभागीय कृषी सहसंचालकांनी राज्याच्या कृषी आयुक्तांना पाठविण्यात आलेल्या गोपनीय अहवालात तालुका कृषी अधिकारी आर. बी. माने यांच्यासह तीन जणांना निलंबित करण्याची शिफारस केली आहे. याशिवाय उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. एस. माईनकर यांनी हा गैरव्यवहार दडपण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी करण्याची शिफारस सहसंचालकांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पाणलोटाचा पैसा जिरवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनातील मृदसंधारणाची लाखो रुपयांचे धनादेश बेधडक ठेकेदारांच्या हवाली केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. पाणलोट समितीने कामे केल्याचे सांगून ४० लाख रुपयांची बिले राज्य शासनाच्या निधी वितरण प्रणालीतून मंजूर न करता थेट धनादेश तयार करून वाटले गेले, असा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे. 

पाणलोटाची कामे करताना शासकीय आदेशाचे उल्लंघन झाले आहे. या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने कामाचा कालावधी व तांत्रिक मान्यतेच्या तारखा बदलून अनुदान लाटले आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. 

दरम्यान, कृषी खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणून माफीचा साक्षीदार झालेल्या कृषी पर्यवेक्षकाला खुनाच्या धमक्या आल्यामुळे आता त्याने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. कृषी खात्यातील भ्रष्ट लॉबीने या पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाकण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. पुढील चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी या पर्यवेक्षकाला कामावरून काढून टाका, अशी मागणी वरिष्ठांकडे केली जात आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
गोंधळलेला शेतकरी अन् विस्कळित नियोजनशेती क्षेत्रात सर्वाधिक महत्त्व हे नियोजनाला आहे...
निराशेचे ढग होताहेत अधिक गडद७  ते १० जूनपर्यंत सर्वत्र चांगला पाऊस   ...
राज्यात नवीन फळबाग लागवड योजना लागूमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट...
मॉन्सूनचे प्रवाह सुरळीत होऊ लागले...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
‘एसएमएस’ अटीमुळे हजारो शेतकरी...लातूर : शासनाने राज्यातील चार लाखापेक्षा जास्त...
शेतातील जीवसृष्टी सांभाळल्यास मातीतून...नाशिक : शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे अडचणीत...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी चारसूत्री...नवी दिल्ली ः देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२...
कांदाप्रश्‍नी ‘करेक्शन’ करण्याच्या...नाशिक : लोकसभेच्या आगामी निवडणुकांकडे लक्ष...
राज्यातील १४५ बाजार ‘ई-नाम’शी जोडणारमुंबई (प्रतिनिधी) : शेतमालाला रास्त भाव मिळवून...
काय आणि कसं पेरावं ?लाखनवाडा, जि. बुलडाणा ः लाखनवाडा येथे एेन खरीप...
जलसंधारण, बहुवीध पीक पद्धतीतून धामणी...अनेक वर्षांपासून दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या...
भारताला 'बीजी थ्री’कापसाची अद्याप...भारतात बीटी कापसातील ‘बीजी टू’ हे तंत्रज्ञान...
का झाले बीटीचे वाटोळे?राज्यात सुमारे १५० लाख हेक्टरवर खरिपाचा पेरा होतो...
अनधिकृत कापूस बियाणे आणि हतबल सरकारमहाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने ...
नवे संशोधन, नवे वाण ही काळाची गरज...आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारास झालेला विलंब...
मुबलक पाणी... पण् पैशाअभावी शेत नापेरजळगाव ः कर्जमाफीच्या यादीत पाच महिन्यांपूर्वी नाव...
एच. टी. तंत्रज्ञानाला मान्यता देऊन...पुणे ः राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या कापूस...
कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज...पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली...
'श्रीं'ची पालखी निघाली पंढरीला...शेगाव जि. बुलडाणा ः श्री संत गजानन महाराज...
नाशिककरांना आज मिळणार जमीन समृद्ध... नाशिक ः ‘समृद्ध माती, जमीन सुपीकता आणि पीक...