दूध प्रश्नावर दिल्लीत विविध उपायांची चाचपणी : पाशा पटेल

दूध दरप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी  (ता.१७) बैठक घेतली.
दूध दरप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता.१७) बैठक घेतली.

नवी दिल्ली/पुणे  ः दूध दरप्रश्‍नी ताेडगा काढण्यासाठी देशातील सुमारे साडेतीन लाख टनांचा दुग्धजन्य उत्पादनांचा साठा कमी करण्यासाठी बफर स्टॉकसह, शालेय पाेषण आहारात दुधाचा वापर, दुग्धजन्य उत्पादनांवरील जीएसटी कमी करणे, मित्र राष्ट्रांना आर्थिक मदती एेवजी दुग्धजन्य उत्पादनांची मदत करता येईल का? आदि विविध विषयांवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता.१७) दिल्लीत बाेलविलेल्या बैठकीत चर्चा झाली. याबाबत आज बुधवारी (ता.१८) पुन्हा बैठक हाेणार असल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली.  दूध दर प्रश्नावर ताेडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सुरेश प्रभू, पीयूष गाेयल, केंद्रीय कृषिमंत्री राधामाेहन सिंह राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यात बैठक झाली. बैठकीला साेनई दूधचे दशरथ माने, अमूल दूधचे व्यवस्थापकीय संचालक श्री. साेडी आदी उपस्थित हाेते.  बैठकीमध्ये देशांतर्गत असलेला दूध पावडर, बटर, तूप आदि २० प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचा साठा कमी करण्याबराेबरच, या उत्पादनांचा बफर स्टॉक करता येईल का? लॅक्टाेज पावडरचा गैर वैद्यकीय वापरातून कृत्रिम दूध बनवले जाते का? आणि याचा अतिरिक्त दुधाशी संबंध आहे का? यावर चर्चा झाली, तर हा स्टॉक कमी करण्यासाठी मित्र राष्ट्रांना करावयाच्या आर्थिक मदतीएेवजी दुग्धजन्य पदार्थांची मदत करता येईल का? याबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याशी, देशपातळीवर शालेय पाेषण आहारात दुधाचा समावेश करता येईल का? यासाठी प्रकाश जावडेकर आणि मेनका गांधी यांच्या बराेबर बुधवारी (ता.१८) बैठक हाेणार आहे.    याबाबत बाेलताना दशरथ माने म्हणाले, की दूध दर प्रश्‍न साेडविण्याबाबत सर्वंकष चर्चा झाली. सर्व मंत्र्यांनी आमचे म्हणणे आणि मागण्या एेकून घेतल्या. चर्चा सकारात्मक झाली. मात्र केंद्र सरकारने २० जुलैच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जीएसटी ५ टक्के केला नाही तर आम्ही जाहीर केलेली १ रुपयांची दरवाढ देऊ शकणार नाही. याचा विचार केंद्र सरकारने करावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com