agrowon news in marathi, Pasha patel says, milk rate will give from all options, Maharashtra | Agrowon

विविध पर्यायांतून दुधाला दर देण्यासाठी प्रयत्नशील ः पाशा पटेल
टीम अॅग्रोवन
बुधवार, 4 जुलै 2018

पुणे ः दूध उत्पादक शेतकरी आणि संघांना आंदाेलनाची वेळ येऊ देणार नाही. यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असून, केवळ आंदाेलनामुळेच प्रश्‍न सुटणार नाही, तर विविध पर्यायांतून दुधाला चांगले दर देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वयाने मार्ग काढू, असे आश्‍वासन राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी (ता. ३) झालेल्या मुख्यमंत्री दूध सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.

पुणे ः दूध उत्पादक शेतकरी आणि संघांना आंदाेलनाची वेळ येऊ देणार नाही. यासाठी मी स्वतः प्रयत्नशील असून, केवळ आंदाेलनामुळेच प्रश्‍न सुटणार नाही, तर विविध पर्यायांतून दुधाला चांगले दर देण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी समन्वयाने मार्ग काढू, असे आश्‍वासन राज्य कृषी मूल्य आयाेगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मंगळवारी (ता. ३) झालेल्या मुख्यमंत्री दूध सल्लागार समितीच्या बैठकीत दिले.

दूध प्रश्‍नासाठी करावयाच्या उपायाेजनांसाठी मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या दूध सल्लागार समितीची बैठक मंगळवारी (ता. ३) श्री. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर दुग्धजन्य पदार्थावरी जीएसटील १२ टक्क्यांवरून ५ टक्के करावा, शालेय पाेषण आहारात दुधाचा समावेश करावा, युराेपातून हाेणाऱ्या लॅक्टाेज आणि वे पावडरवरील आायात शुल्क ६० टक्के करावे, आणि गुजरातच्या धर्तीवर दूध पावडर निर्यात अनुदान ५० रुपये द्यावे. अशा प्रमुख मागण्या मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्र्यांद्वारा केंद्र सरकारशी समन्वय करणार आहे. असेही पटेल यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, दुग्धजन्य पदार्थांच्या आराेग्यवर्धक जनजागृतीसाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करण्यात येईल. यासाठी दूध संघांना आपल्या नफ्यातील काही वाटा ट्रस्टसाठी द्यावा, अशी मागणी स्वराज डेअरीचे अध्यत्र रणजित निंबाळकर यांनी केली.

बैठकीला साेनई दूधचे दशरथ माने, साेलापूर संघाचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक, बारामती दूध संघाचे संदीप जगताप, पुणे जिल्हा दूध संघाचे गाेपाळ म्हस्के, कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, गाेविंद डेअरीचे राजीव मिश्रा, पराग डेअरीचे संजय मिश्रा, गाेकुळचे दत्तात्रेय घाणेकर, डायनॅमिक्सचे प्रवीण आैटी, प्रभातचे राजेश लेले आदी उपस्थित हाेते.

स्वाभिमानीच्या आंदाेलनाला पाठिंबा नाही ः माने
दुधाला दर नसल्याने अगाेदरच शेतकरी अडचणीत असताना, आंदाेलन करून अधिक अडचणीत येणार आहे. आंदाेलनामुळे परराज्यांतील दूध विक्रीला संधी मिळते. याची झळ गेल्या दाेन वर्षांपूर्वी झालेल्या आंदाेलनामुळे बसली अाहे. त्यातून अजून सावरता आलेले नाही. अमूलचे दूध पाेलिस आणि सैन्याच्या बंदाेबस्तात विक्री झाल्याने अमूल राज्यात फाेफावला आहे. यामुळे स्वाभिमानीच्या आंदाेलनाला आमचा पाठिंबा नाही, असे ठामपणे दशरथ माने यांनी या वेळी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
समजून घ्या पाण्याचे महत्त्वपाण्याची समस्या शाश्वत पद्धतीने सोडवण्यासाठी...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...
एका संदेशाने आयुष्य केले बळकटटाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः काही तासांपूर्वी...
'दावणीलाही नाही आणि छावणीत नाही; जनावरे...सोलापूर :  मागील सरकारच्या काळात छावणीत...
वनहक्काच्या ४३ हजारांहून अधिक...मुंबई : राज्यात मागील अवघ्या तीन महिन्यांत...
खानदेशात मका दरात वाढजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
पशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
दुष्काळातही भाजीपाला शेतीतून मिळविले...लातूर जिल्ह्यातील उमरगा (यल्लादेवी) येथील माळी...
रयत राजाची अन् राजा रयतेचाहिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचा लोककल्याणकारी...
थकीत एफआरपीचा तिढासा  खरेच्या किमान विक्री मूल्यात प्रतिक्विंटल २००...
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...