दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ कॉर्नेली मिन्नार यांनी कीटकां
अॅग्रो विशेष
मुंबई : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे कृषी खात्यातील तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी अशा सुमारे चारशे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेला आठवडाभर थांबले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बदल्यांच्या या फाइलवर सही केल्याचे समजते. या अधिकाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे कृषी खात्यातील तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी अशा सुमारे चारशे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गेला आठवडाभर थांबले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बदल्यांच्या या फाइलवर सही केल्याचे समजते. या अधिकाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दर ३ वर्षांनी बदल्या होणे अपेक्षित असताना गेल्या पाच वर्षांपासून राज्यात तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकारी यांच्या बदल्या रखडल्या होत्या. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. तर गेल्या वर्षी राज्य सरकारने उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान सुरू केल्याने बदल्या थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा तरी वेळेत बदल्या होतील, अशी आस कृषी अधिकाऱ्यांमध्ये होती.
यंदा प्रथमच कृषी खात्यात शासनाच्या समुपदेशन धोरणानुसार बदली प्रक्रिया घेण्यात आली. मे महिन्याच्या १६ आणि २६ तारखेला कृषी आयुक्तालयात तालुका कृषी अधिकारी आणि मंडळ कृषी अधिकाऱ्यांच्या सर्वांसमोर पसंतीक्रमानुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. १८४ तालुका कृषी अधिकारी आणि २२५ मंडळ कृषी अधिकारी यांचा यात समावेश आहे. त्यानंतर कृषी आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी बदल्यांची ही फाइल कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे पुढील मान्यतेसाठी पाठविली. त्यानुसार ३१ मे रोजी बदल्यांचे आदेश निघणे अपेक्षित होते.
मात्र, कृषिमंत्री श्री. फुंडकर यांचे ३१ मे रोजीच आकस्मित निधन झाल्याने बदल्यांची प्रक्रिया रखडली. ३१ मेनंतर मुख्यमंत्र्यांची मान्यता असेल, तरच अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ही फाइल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे होती. आठवडा उलटला तरी मुख्यमंत्री कार्यालयातून बदल्यांच्या या फाइलला हिरवा कंदील मिळाला नसल्याने कृषी अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता होती.
बदल्यांचे आदेश न निघाल्याने मुलांचे शाळा, महाविद्यालयांचे प्रवेश कुठे घ्यायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांपुढे होता. तसेच सध्या खरीप हंगाम तोंडावर आहे. अशात तातडीने नव्या ठिकाणी रुजू होऊन खरीप हंगामाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे यासाठीसुद्धा बदल्यांचे आदेश लवकर निघावेत अशी मागणी अधिकाऱ्यांची होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बदल्यांच्या या फाइलवर सही केल्याचे समजते. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदलीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
- 1 of 290
- ››