agrowon news in marathi, permission for new marketing amendment will soon, Maharashtra | Agrowon

पणन सुधारणांना लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे ः केंद्र शासनाच्या नवीन मॉडेल ॲक्ट स्वीकारण्याबाबत पणन संचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध ३० पणन सुधारणांची शिफारस शासनाकडे केली अाहे. या सुधारणांना तातडीने मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये या सुधारणांचे विधेयक सादर न करता राज्यपालांच्या आदेशाने अधिवेशनापूर्वीच वटबहुकूम प्रसिद्ध हाेण्याची शक्यता आहे. नवीन पणन सुधारणांमध्ये अन्नधान्य नियमनमुक्तीसह पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपुर बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्यात येणार आहे.   

पुणे ः केंद्र शासनाच्या नवीन मॉडेल ॲक्ट स्वीकारण्याबाबत पणन संचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध ३० पणन सुधारणांची शिफारस शासनाकडे केली अाहे. या सुधारणांना तातडीने मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये या सुधारणांचे विधेयक सादर न करता राज्यपालांच्या आदेशाने अधिवेशनापूर्वीच वटबहुकूम प्रसिद्ध हाेण्याची शक्यता आहे. नवीन पणन सुधारणांमध्ये अन्नधान्य नियमनमुक्तीसह पुणे, मुंबई, नाशिक आणि नागपुर बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा देण्यात येणार आहे.   

केंद्र शासनाने मार्च २०१७ मध्ये मॉडेल ॲक्टचा मसुदा राज्य शासनाला सादर केला आहे. या ॲक्टमध्ये विविध सुधारणा सुचविल्या असून, यासाठी पणन संचालक डॉ. अानंद जाेगदंड यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

या समितीची नुकतीच एक बैठक पणन मंडळामध्ये झाली. या बैठकीत विविध ३० सुधारणांवर चर्चा हाेऊन कायद्याचा मसुदा शासनाला पाठविण्यात आला आहे. या मसुद्याला विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहांची मान्यता आवश्‍यक आहे. मात्र या दाेन्ही सभागृहांची मान्यता मिळण्यास विलंब लागण्याची शक्यता असल्याने दाेन्ही सभागृहे सुरू हाेण्यापूर्वीच राज्यपालांच्या सहीने राज्यपत्र प्रसिद्ध करण्याच्या तयारीत सरकार असल्याचे समजते. 

कायद्याच्या नावातून नियमन शब्द जाणार
१९६० च्या पणन कायद्यात नियमन शब्द असल्यामुळे शेतमालाचे नियमन बाजार समित्यांद्वारे हाेत हाेते. मात्र आता नवीन कायद्यामधून नियमन शब्दच वगळण्यात येणार असून, कृषी उत्पादनामध्ये पशुधनाचादेखील समावेश करण्यात आला आहे. यामुळे नवीन कायद्याचे नाव ॲग्रीकल्चर प्राेड्यूस ॲण्ड लाइव्हस्टॉक मार्केटिंग (प्रमाेशन ॲण्ड फॅलिसिटेशन) २०१७ असा असणार आहे.

बाजार आवार नियमनासाठीच असणार
नवीन सुधारणांमध्ये अन्नधान्य नियमुक्तीनंतर बाजार क्षेत्र हे फक्त निवडणुकीसाठीच असणार असून, बाजार आवार हे शेतमाल नियमनापुरते मर्यादित असणार आहे.

ई-प्लॅटफॉर्मचे राज्यपत्र प्रसिद्ध 
नवीन पणन सुधारणांधील बाजार समित्यांमध्ये इलेक्ट्राॅनिक व्यापार सक्तीच्या कायद्यावर राज्यपालांनी शिक्कामाेर्तब केले असून, इतर सुधारणांचे राजपत्र लवकरच प्रसिद्ध हाेण्याची शक्यता आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...