agrowon news in marathi, pest attack on cotton, Maharashtra | Agrowon

कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 जून 2018

अकोला ः या हंगामात मेअखेर तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेली कपाशी दोन ते चार पानांची झालेली आहे. ठिकठिकाणी या पिकात आंतरमशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. हंगाम चांगला राहील, अशी आशा असतानाच बीटी कपाशीच्या पिकावर अळी व अंडी आढळून येत आहेत. यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरवातीलाच चिंतातुर झाला आहे.

अकोला ः या हंगामात मेअखेर तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड झालेली कपाशी दोन ते चार पानांची झालेली आहे. ठिकठिकाणी या पिकात आंतरमशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त झाला आहे. हंगाम चांगला राहील, अशी आशा असतानाच बीटी कपाशीच्या पिकावर अळी व अंडी आढळून येत आहेत. यामुळे शेतकरी हंगामाच्या सुरवातीलाच चिंतातुर झाला आहे.

वऱ्हाडात सोयाबीननंतर कपाशीचे सर्वाधिक क्षेत्र असते. असमतोल पावसामुळे आतापर्यंत सार्वत्रिक पेरण्या झालेल्या नाहीत. मात्र पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पूर्वमॉन्सून कपाशीची लागवड केली आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर तर अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट या तालुक्‍यांमध्ये कपाशीची लागवड करण्यात आलेली आहे. कपाशीचे हे पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मागील आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने याचा फायदा पिकाला होत आहे. पीकवाढीच्या स्थितीत असतानाच आता कपाशीच्या पानांवर अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

गेल्या हंगामात शेतकरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने पार उद्ध्वस्त झाला होता. हंगामात कपाशीवर केलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी कर्जबाजारी बनला आहे. यामुळे चालू हंगामात कपाशीचे लागवड क्षेत्र घटण्याचा अंदाज व्यक्त झाला होता. या हंगामात बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी खाते, कृषी विद्यापीठाने जनजागृती केली. जैविक पद्धतीने अळीचे निर्मूलन करण्याचा सल्ला देण्यात आला. एकीकडे अशी सल्ले दिले जात असताना आता हंगामाच्या अगदी सुरवातीलाच कपाशीच्या पिकावर अळ्या दिसून येत आहेत. ही अळी नेमकी कोणती, तिच्या निर्मूलनासाठी काय उपाययोजना कराव्यात, असे प्रश्‍न शेतकऱ्यांना पडत आहेत. 

मोताळा तालुक्‍यातील कोथळी येथील श्‍याम प्रकाश जुनारे यांनी आठ एकरात १० जूनला बीटी कपाशीची लागवड केली आहे. सध्या त्यांच्या शेतातील कपाशीचे झाड दोन ते तीन पानांचे आहे. मात्र, या कपाशीच्या प्रत्येक पानांवर सर्वत्र दोन ते तीन अळ्या तसेच अंडी दिलेली दिसून येत आहेत. सध्या ढगाळ वातावरणामुळे किडीत वाढीची शक्‍यता असल्याने चिंता अधिक वाढली आहे.

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...