agrowon news in marathi, Plastic ban in state from today, Maharashtra | Agrowon

राज्यात आजपासून प्लॅस्टिकबंदी...
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 जून 2018

मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २२) २० जुलैपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्लॅस्टिकबंदीच्या अध्यादेशावर दाद मागण्यासाठी न्यायालयाने व्यापाऱ्यांना तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. 

मुंबई : राज्य सरकारच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. २२) २० जुलैपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. प्लॅस्टिकबंदीच्या अध्यादेशावर दाद मागण्यासाठी न्यायालयाने व्यापाऱ्यांना तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. 

राज्य सरकारने २३ जूनपासून राज्यात प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा अध्यादेश काढला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला प्लॅस्टिकचे उत्पादक आणि वितरकांनी विरोध केला होता. या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने २० जुलैपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे प्लॅस्टिकबंदीचा कायदा आजपासून राज्यात लागू होणार आहे.

दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लॅस्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो. सर्वसामान्य नागरिकांसाठीचा हा दंड २०० रुपयापर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला. त्यामुळे आता मुंबईतही प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. 

या प्लॅस्टिकवर बंदी 
सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या (यात मायक्रॉन, साइजच्या मर्यादा नाहीत), चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, डेकोरेसन थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक (डब्बे, चमचे, पिशव्या), फरसाण, नमकीन यासाठीची पदार्थांची आवरणे यांचा बंदीत समावेश आहे. यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणाऱ्या प्लॅस्टिकचा यात समावेश नाही.

या प्लॅस्टिकवर बंदी नाही
उत्पादनासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक आणि थर्माकोल, हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येणारी प्लॅस्टिक उपकरणे, सलाइन बॉटल्स, औषधांचे आवरणे, प्लॅस्टिक पेन, दुधाच्या पिशव्या (५० मायक्रॉनच्या वर), रेनकोट, अन्नधान्य साठवण करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, नर्सरीमध्ये वापरण्यात येणारे प्लॅस्टिक, टीव्ही, फ्रिज, कॉम्प्युटर यांसारख्या उत्पादनांना पॅकिंग करताना वापरण्यात येणार थर्माकोल आणि प्लॅस्टिक, बिस्कीट, चिप्स अशा पदार्थांची प्लॅस्टिक आवरणे या प्लॅस्टिकवर कारवाई होणार नाही.

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...