agrowon news in marathi, police action on farmer, Maharashtra | Agrowon

जानकरांशी वाद घालणाऱ्या शेतकऱ्याचा पोलिसांकडून शोध
टीम अॅग्रोवन
बुधवार, 18 जुलै 2018

नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे सांगितल्यानंतर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना फोनवरून ‘आताच कसे तुम्ही शेतकऱ्यांचे असल्याचे सांगता, एवढ्या दिवस कोठे होता,’ अशी विचारणा करणाऱ्या नगरमधील एका शेतकऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नगर ः दुधासह शेतीमालाला दर मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे सांगितल्यानंतर दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना फोनवरून ‘आताच कसे तुम्ही शेतकऱ्यांचे असल्याचे सांगता, एवढ्या दिवस कोठे होता,’ अशी विचारणा करणाऱ्या नगरमधील एका शेतकऱ्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

दुधाला सत्तावीस रुपये दर मिळावा किंवा प्रति लिटर पाच रुपये शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अंदोलन सुरू केले आहे. दुधाचा प्रश्‍न गंभीर असून, दराअभावी हा व्यवसाय मोडकळीस आला असल्याने अनेक शेतकरी, संघटना आणि कार्यकर्त्यांनी अंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अंदोलन सुरू झाल्यानंतर नगर तालुक्‍यातील मांडवे गावच्या एका शेतकऱ्याने काल (सोमवारी) थेट दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना फोन लावला. ‘‘सरकार दुधाच दराबाबत सकारात्मक आहे,’’ असे सांगितले जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जानकर यांना त्या शेतकऱ्याने ‘‘आताच दुधावर कसे बोलता, याआधी कोठे होतात,’’ अशी विचारणा केल्यानंतर मंत्री जानकर यांनी ‘प्रत्यक्ष भेटा, बोलू’ असे सांगितले. मात्र त्या शेतकऱ्याने पुन्हा चढ्या आवाजात तोच प्रश्‍न केला. त्यानंतर मंत्र्यांनी फोन बंद केला. 

काही वेळाने मात्र पोलिस त्या शेतकऱ्याच्या घरी पोचले. फोन करणारा शेतकरी घरी नसल्याने त्याच्या वडिलांना पोलिसांनी बोलावले व चौकशी करून सोडून दिले. फोन करणारा शेतकरी दुसऱ्या दिवशीही पोलिसांना सापडला नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. ‘मंत्र्यांना फोन करणे शेतकऱ्याला महाग पडले’, असा संदेश सर्वत्र गेल्यानंतर मात्र पोलिसही त्याबाबत काही बोलायला तयार नाहीत. मात्र फोन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांचा शोध घेत असल्याचा बाबीला पोलिसांनी दुजोरा दिला. मात्र त्याबाबत पोलिस स्पष्ट बोलत नाहीत.

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...