agrowon news in marathi, possibilities of animal census in next week, Maharashtra | Agrowon

राज्यात पुढील आठवड्यात पशुगणना होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 जुलै 2018

पुणे ः टॅब खरेदीमधील संभ्रम आणि गाेंधळामुळे वर्षभर रखडलेल्या २० व्या पशुगणनेला पुढच्या आठवड्यात मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले हाेते. आॅक्टाेबर २०१७ अखेर पशुगणना हाेणे अपेक्षित हाेते; मात्र टॅबच्या उपलब्धतेबाबतच्या दिरंगाईमुळे  पशुगणना रखडली. मात्र टॅब उपलब्धतेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुरवठादाराकडून करार हाेण्याची शक्यता पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून व्यक्त केली असून, पुढील आठवड्यात प्रत्यक्ष पशुगणनेला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. 

पुणे ः टॅब खरेदीमधील संभ्रम आणि गाेंधळामुळे वर्षभर रखडलेल्या २० व्या पशुगणनेला पुढच्या आठवड्यात मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने संगणकीकृत पद्धतीने पशुगणना करण्याचे आदेश दिले हाेते. आॅक्टाेबर २०१७ अखेर पशुगणना हाेणे अपेक्षित हाेते; मात्र टॅबच्या उपलब्धतेबाबतच्या दिरंगाईमुळे  पशुगणना रखडली. मात्र टॅब उपलब्धतेची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुरवठादाराकडून करार हाेण्याची शक्यता पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून व्यक्त केली असून, पुढील आठवड्यात प्रत्यक्ष पशुगणनेला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. 

केंद्र शासनाने `इनाफ` याेजनेअंतर्गत यंदाची २० वी पशुगणना टॅबद्वारे करण्याचा निर्णय देशपातळीवर घेतला. यासाठी केंद्र सरकार टॅब उपलब्ध करून देणार हाेते; मात्र नंतर राज्यांनी टॅब खरेदी करण्याचे सांगण्यात आले. टॅब खरेदीसाठी केंद्र शासन ६० टक्के निधी देणार हाेते. राज्याने ४० टक्के रक्कम द्यायची असे ठरले हाेते. केंद्राने टॅब खरेदी करताना सहा हजार रुपयांपर्यंतच्या मर्यादेतील खरेदीसाठी परवानगी दिली. महाराष्ट्राला ७ हजार २०० टॅबची आवश्‍यकता हाेती. मात्र एेन खरेदीच्या टप्प्यातच राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातूनच खरेदी करण्याचे आदेश काढले.

या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाने महामंडळाकडे मागणी नाेंदविल्यानंतर महामंडळाने याच टॅबची रक्कम ११ हजार रुपये सांगितल्याने अडचण निर्माण झाली. हेच टॅब मध्य प्रदेश सरकारने पाच हजार तीनशे रुपये दराने खरेदी केले. यामुळे टॅब खरेदीमध्ये सावळा गाेंधळ निर्माण झाला हाेता. यामुळे पशुगणना रखडली हाेती.

दरम्यान टॅब खरेदीमधील दर निश्‍चिती आणि काेणाकडून खरेदी करायची आणि दराबाबतच्या अडचणीबाबत पशुसंवर्धन आयुक्तालयाने राज्य शासनाने मार्गदर्शन मागवले हाेते. त्यानुसार ५ हजार ६९९ रुपये दराने टॅब खरेदी झाली असून, पुरवठादाराबराेबर करार करण्याची प्रक्रिया पूर्ण हाेईल. यानंतर पुढील आठवड्यात प्रत्यक्ष पशुगणनेला सुरवात हाेईल, असे पशुसंवर्धन आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...